कमाल आहेत हे Mivi Earbuds, गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरजही नाही! अशा प्रकारे करणार काम
सध्याच्या काळात इअरबड वापरणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा ऑफीसमध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तिच्या कानात त्याच्या आवडत्या कंपनीचे इअरबड पाहू शकता. इअरबड वापरणं सामान्य गोष्ट असली तरी AI इअरबड वापरण्यात एक वेगळीच मजा आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेले Hi Mivi हे AI इअरबड अतिशय खास आहेत, आणि हे Apple च्या Siri आणि Amazon च्या Alexa पेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे नवे AI इअरबड Mivi ने लाँच केले आहेत.
Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल
हे एआय इअरबड आवाजाने नियंत्रित केले जाऊ शकते. तुम्ही फक्त एका प्रॉम्प्टने बिर्याणी आणि इतर अनेक गोष्टी बनवायला शिकू शकता. हे एआय इअरबड कंपनीच्या 100 हून अधिक अभियंत्यांनी तयार केले आहे. ज्याला सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागला असून हे एआय इअरबड्स बनवण्याचा खर्च सुमारे 100 कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य –Mivi)
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर हे इअरबड आपोआप चालू होईल. सिरी आणि अलेक्सा स्मार्टफोनशी कनेक्ट होतात, तर हाय मिव्ही एआय बड्स स्वतःच एक स्मार्ट डिव्हाइस आहेत. कानात टाकल्यानंतर फक्त इंटरनेटची आवश्यकता आहे, फोनची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही हे इअरबड इंटरनेटसोबत कनेक्ट करून कानात घाला आणि यानंतर हे इअरबड तुम्हाला अनेक कामांसाठी मदत करणार आहे.
तुम्ही या इअरबडला एखादी रेसिपी विचारली तर हे इअरबड तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या पदार्थाची संपूर्ण रेसिपी सांगणार आहे. अगदी कोणत्या भाज्या कापायच्या आहेत आणि किती वेळ शिजू द्यायच्या आहेत, या सर्वाबद्दल हे इअरबड तुम्हाला माहिती देणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाईप करून काही सर्च करण्याची देखील गरज नाही. तुम्ही या AI इअरबडला प्रॉम्प्ट देऊन अनेक गोष्टींची माहिती मिळवू शकता.
Hi Mivi च्या मदतीने, तुम्ही फक्त आवाज देऊन तुमच्या आईच्या हातांसारखी बिर्याणी बनवायला शिकू शकाल. जर तुम्हाला तुमच्या आईची आठवण येत असेल, तर इअरबड एक अंगाईगीत गाईल. होय, हे इअरबड तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टनुसार अंगाईगीत देखील गाणार आहे. हे एआय बड्स हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आणि 1000 हून अधिक भारतीय बोलींमध्ये बोलू शकते. हे बड्स तुम्हाला ताज्या बातम्यांबद्दल देखील माहिती देऊ शकतात. ज्यामुळे जगात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला टिव्ही पाहण्याची देखील आवश्यकता असणार नाही.
इअरबड माणसांसारखा भावनिकपणेही बोलेल. ते माणसांसारखे भावनिकपणे बोलून समस्येचे निराकरण देखील सांगेल. इअरबडच्या किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. मात्र कंपनीने अधिकृतपणे अद्याप या इअरबडची किंमत जाहीर केली नाही. या महिन्याच्या अखेरीस इअरबड बाजारात उपलब्ध होईल. एमआयव्ही एआयचे सह-संस्थापक विश्वनाथ कंडुला म्हणाले की, एआय बड्स बनवण्याचा उद्देश भारतीयांना आपलेपणाची भावना निर्माण करणे आहे.