स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! Motorola च्या नव्या स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 5,200mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
किंमतीबद्दल बोलायंच झालं तर, Moto G Power (2026) ची किंमत US मध्ये 299.99 डॉलर म्हणजेच सुमारे 27,100 रुपये आहे आणि कॅनडामध्ये या स्मार्टफोनची किंमत CAD 449.99 म्हणजेच सुमारे 29,550 रुपये आहे. ही किंमत 8GB रॅम+ 128GB व्हेरिअंटसाठी आहे. हँडसेटची विक्री 8 जानेवारीपासून सुरु होणार आहे. ग्राहक अधिकृत वेबसाइट आणि पार्टनर ई-कॉमर्स आणि ऑफलाइन स्टोअर्समधून नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
Design meets durability with the NEW moto g power – 2026, featuring a sharp, durable 6.8” 120Hz FHD+ display and up to 49 hours of battery life🔋🙌 Register now: https://t.co/McEC8wJVAv pic.twitter.com/ry93PXP8DP — motorolaus (@MotorolaUS) December 16, 2025
Moto G Power (2026) च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 6.8-इंच फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि एक हाई ब्राइटनेस मोड देखील देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. ऑडिओसाठी या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस-पावर्ड स्टीरियो स्पीकर दिले आहेत. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच 8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देखील आहे. हे डिव्हाईस लेटेस्ट Android 16 वर चालते.
फोटोग्राफीसाठी नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Moto G Power (2026) मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये पुढील बाजूला 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Ans:
Ans:
Ans:






