Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो
Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप
ईमेज क्रिएशन अधिक सोपे व्हावे आणि यूजर्सना मोठ्या प्रॉम्पट्सचा वापर करण्याची गरज भासू नये, याच उद्देशाने कंपनीने त्यांचे नवीन अपडेट जारी केले आहे. आतापर्यंत ईमेज क्रिएट करताना यूजर्सना बरेच डिटेल्स प्रॉम्पट्समध्ये शेअर करावे लागत होते. तसेच रेफरेंस फोटोज देखील अपलोड करावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता गुगल जेमिनीच्या नव्या अपडेटमुळे एआय प्लॅटफॉर्म जेमिनी कनेक्टेड गुगल अॅप्समुळे यूजर्सबाबत जास्त माहिती मिळवू शकणार आहेत. या माहितीचा वापर ईमेज क्रिएट करताना केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल जेमिनीसाठी जारी करण्यात आलेले नवीन अपडेट पर्सनल इंटेलिजेंस सिस्टिम आणि त्याच्या नॅनो बनाना 2 इमेज जनरेशन मॉडेलवर आधारित आहे. पर्सनल इंटेलिजेंस सिस्टिम आणि त्याच्या नॅनो बनाना 2 हे दोन्ही मिळून जेमिनीला अशा गुगल अॅप्सबाबत माहिती देतात, जे यूजर्सनी त्यांच्या अकाऊंटला जोडलेले आहेत. उदाहरणार्थ, एक मोठा प्रॉम्प्ट आण सर्व डिटेल्स शेअर करण्यापेक्षा यूजर्स आता केवळ माझ्या घराचे डिझाईन तयार कर किंवा माझ्या निर्जन बेटावरील अत्यावश्यक वस्तूंचे चित्र तयार करा, असे छोटे आणि सोपे प्रॉम्प्ट्स वापरू शकणार आहेत. या प्रॉम्प्ट्सनंतर जेमिनी कनेक्टेड अॅपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर फोटो जनरेट करणार आहे.
जर यूजर्सनी गुगल फोटो लाइब्रेरीला लिकं केले तर जेमिनी इमेज क्रिएशन प्रोसेसमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लोकांचे आणि प्राण्यांचे लेबल्ड फोटोज वापरले जाऊ शकतात. यामुळे एआयला वापरकर्त्याच्या वास्तविक जीवनातील लोकांना तयार होणाऱ्या प्रतिमांमध्ये समाविष्ट करणे शक्य होईल.
दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास
उदाहरणार्थ, यूजर्सनी जर जेमिनीला सांगू शकतात की, मी आणि माझे कुटुंब आमच्या आवडत्या गोष्टीचा आनंद घेत असल्याची क्लेमेशन प्रतिमा तयार करा आणि लायब्रेरीमधील फोटोचा रेफरेंस घेऊन फोटो तयार कर. तसेच यूजर्स वॉटरकलर पेंटिंग्स, चारकोल स्केच आणि ऑयल पेंटिंग्स सारख्या वेगवेगळ्या आर्ट स्टाइल्स देखील वापरून पाहू शकतात. जेमिनी द्वारे तयार करण्यात आलेली प्रतिमा योग्य नसेल तर यूजर्स अधिक सूचना देऊन ती प्रतिमा बदलू शकणार आहेत किंवा गूगल फोटोज लायब्ररीमधून दुसऱ्या रेफरेंस ईमेज निवडू शकणार आहेत. तसेच गुगलने स्पष्टपणे सांगितलं आहे की, जेमिनी मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी वैयक्तिक गुगल फोटो लायब्रेरीचा थेट वापर केला जाणार नाही.






