नाझी नेता जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
एक असा हुकूमशाह ज्याच्या नावाने आजही दहशत निर्माण होते तो म्हणजे अॅडॉल्फ हिटलर. नाझीचा नेता असलेला अॅडॉल्फ हिटलर याचा आजच्या दिवशी 1889 साली जन्म झाला. ऑस्ट्रियातील ब्राउनाऊ आम इन हे त्याचे जन्मस्थान असून त्याने अत्यंत अमानूष हत्या केल्या. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीतील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा फायदा घेत त्याने आपली सत्ता मजबूत केली.
१९३३ मध्ये तो जर्मनीचा चान्सलर बनला आणि नंतर हुकूमशहा झाला. हिटलरच्या कारकिर्दीत आक्रमक राष्ट्रवाद, वंशभेद आणि ज्यूविरोधी धोरणे यांना प्राधान्य दिले गेले. त्याच्या नेतृत्वाखाली जर्मनीने १९३९ मध्ये पोलंडवर आक्रमण केले, ज्यामुळे World War II सुरू झाले. या युद्धात लाखो लोकांचा बळी गेला. विशेषतः ज्यू समाजावर झालेल्या नरसंहाराला Holocaust म्हणून ओळखले जाते. १९४५ मध्ये जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यावर हिटलरने आत्महत्या केली. त्याच्या कारभारामुळे जगभरात मोठे विध्वंस आणि मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले. (Dinvishesh)
20 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
20 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
20 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






