फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट, आता OnePlus 13T ली मिळणार iPhone चं हे सर्वात खास फीचर
OnePlus एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची जोरदार तयारी करत आहे. या आगामी फोनमध्ये काहीतरी खास दिलं जाणार आहे. ज्यामुळे युजर्सना आयफोन वापरत असल्याचा अनुभव येऊ शकतो. OnePlus चा आगामी स्मार्टफोन OnePlus 13T एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट समोर आली नाही.
एप्रिलमध्ये लाँच होणार हे 5 जबरदस्त Smartphones, प्रत्येकात काय असेल खास? जाणून घ्या
OnePlus 13T च्या लाँचिंगसोबत युजर्सना एक खास सरप्राईज दिलं जाणार आहे. खरं तरं काही आठवड्यांपूर्वी वनप्लसचे सीईओ पीट लाउ यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या डिव्हाईसमधील अलर्ट स्लाइडर पूर्णपणे काढून टाकणार आहेत. केवळ डिव्हाईसमधून अलर्ट स्लाइडर काढून टाकलं जाईल, एवढचं नाही तर काहीतरी नवीन देखील अॅड केलं जाणार आहे. वनप्लस 13T मध्ये आता अलर्ट स्लाइडरला iPhone सारख्या अॅक्शन बटनने बदललं जाणार आहे. ज्याला क्विक Key असं नाव देण्यात आलं आहे. क्विक Key मध्ये अनेक कस्टमाइजेशन पाहायला मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
OnePlus 13T बद्दल काही लिक्स समोर आले आहेत. या लिक्सवरून असं दिसतं की, कंपनी Apple च्या हार्डवेयरपासून प्रेरणा घेत आहे. याचं कारण म्हणजे आगामी OnePlus 13T मध्ये स्पेशल क्विक की नावाचं एक नवीन फीचर पाहायला मिळणार आहे. समोर लिक्सनुसार, हँडसेटच्या डाव्या बाजूला एक छोट बटण पाहायला मिळणार आहे. हे बटण लेटेस्ट iPhones मध्ये मिळणाऱ्या कॅमेरा बटन सारखे दिसत आहे.
OnePlus 13T will be the first smartphone to feature an Action Button (single press for silent, vibrate, and mute), replacing OnePlus’ iconic alert slider.#oneplus13t pic.twitter.com/16Baaqzu4k
— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 7, 2025
आगामी स्मार्टफोन ऑफिशिअल लाँच होण्यापूर्वी बेंचमार्किंग प्लेटफॉर्म AnTuTu वर स्पॉट करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत. मॉडेल नंबर PKX110 सह स्पॉट झालेला हा आगामी स्मार्टफोन लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे. लिस्टिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 120Hz डिस्प्ले, 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज असे काही फीचर्स आगामी स्मार्टफोनमध्ये दिले जाणार आहेत.
वनप्लस चायना चेअरमन ली जी लुई यांनीही अलीकडेच या नवीन फीचरवर प्रकाश टाकणारा टीझर पोस्ट केला आहे. कंपनीच्या अध्यक्षांच्या मते, क्विक की हे नियमित अलर्ट स्लायडरपेक्षा खूपच चांगले आहे, जे बऱ्याच काळापासून वनप्लस डिव्हाइसेसचे वैशिष्ट्य आहे.
डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, लीक झालेल्या रेंडरवरून असे दिसून येते की यावेळी डिव्हाइस स्वतःची ओळख निर्माण करू शकते. OnePlus 13T मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे जो उभ्या किंवा आडव्या गोळीच्या आकाराच्या मॉड्यूलसह येऊ शकतो. डिस्प्लेच्या बाबतीत, OnePlus 13T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंच 1.5K OLED पॅनेल देखील असू शकतो, जो मानक OnePlus 13 च्या 6.82-इंच स्क्रीनपेक्षा लहान आहे, परंतु लहान स्क्रीन असूनही, तो एक उत्तम दृश्य अनुभव देऊ शकतो. यामुळे डिस्प्लेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता अधिक कॉम्पॅक्ट फोन पसंत करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा एक उत्तम फोन बनू शकतो.