Samsung च्या या Fold Smartphone वर मिळतंय तब्बल 38 हजार रुपयांचं Discount, ही फायद्याची Deal मिस करू नका
आयफोन आणि ब्रँडेड स्मार्टफोनसोबतच लोकांमध्ये फोल्ड स्मार्टफोनची देखील तितकीच क्रेझ आहे. त्यामुळे सध्या लोकं फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोनकडे अधिक आकर्षित होत आहेत. तुम्ही देखील तुमच्यासाठी फोल्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सॅमसंगचा फोल्ड स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन Samsung Galaxy Z Fold 6 च्या खरेदीवर तब्बल 38 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर करत आहे. त्यामुळे हा प्रिमियम आणि महागडा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
अॅमेझॉन त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास डिल घेऊन आला आहे. ही डिल सर्वच स्मार्टफोन युजर्सच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन येणार आहे. कारण या डिलमध्ये ग्राहकांना Samsung Galaxy Z Fold 6 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर कंपनीने Samsung Galaxy Z Fold 6 हा स्मार्टफोन 1,64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र या स्मार्टफोनवर आता तब्बल 38 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर या स्मार्टफोनची किंमत 1,64,999 रुपये आहे. मात्र अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,26,899 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म गॅलेक्सी Z फोल्ड 6 वर 38,100 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट ऑफर करत आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचं झालं तर फेडरल बँक क्रेडिट कार्डसह 2,000 रुपये आणि वनकार्ड क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शन वर 1,250 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. या ऑफरमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर अधिक डिस्काऊंट मिळणार आहे. तथापि, ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते.
Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा एक प्रिमियम स्मार्टफोन आहे. या डिव्हाईसमध्ये 7.6 इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि 6.3 इंचाची कवर स्क्रीन आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट वाले डायनामिक AMOLED 2X पॅनल आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 10MP का फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Google I/O 2025: Gemini 2.5 मध्ये झाला मोठा बदल! AI ला मिळाला मानवी अंदाज आणि Deep Think ची ताकद
या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय या हँडसेटमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 4400mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये अनेक नवीन AI-पावर्ड फीचर्स आणि टूल्स देखील आहेत, जसं की सर्कल टू सर्च, लाइव ट्रांसलेट, इंस्टेंट स्लो-मो, स्केच टू इमेज आणि अनेक नवीन फीचर्स हँडसेटमध्ये देण्यात आले आहेत.