फोटो सौजन्य - Social Media
आमिरने तिसरे लग्न केल्यामुळे जगभरातून त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरुये. अशामध्ये महाराष्ट्र शासनाचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आमिरच्या तिसऱ्या लग्नावर विधाने केली आहेत. ते सांगतात की, “जे हिंदू लोकं आमिर खानला सेलिब्रिटी मानतात किंवा त्याचे चित्रपट पाहतात त्यांनी जरा विचार करून त्याच्या सिनेमांना मोठे करावे. अभिनेता आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबेसिडर बनत चालला आहे.”
यावर सिनेप्रेक्षकांनी तसेच काही नितेश राणे यांच्या समर्थकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या काही समर्थकांनी त्यांच्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे. त्यांना या गोष्टी पटल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे तर आमिर खानच्या चाहत्यांनी उलट नितेश राणे यांनाच सवाल केला आहे की “जर अभिनेता आमिर खान लव्ह जिहाद करत आहेत तर त्यांनी त्यांची पोटची मुलगी सून म्हणून एका हिंदू मराठी कुटुंबात का दिली?” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
महिलांनो… ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचा रिमेक आला! Anmol TV वर सारखीच मालिका नव्या ढंगात
सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीमध्ये साईनाथाच्या प्रतिमेसमोर मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर वक्तव्य केले असल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.






