स्नॅपचॅट युजर्ससाठी आनंदाची बातमी! तुम्ही आता AI शी बोलू शकता, कसं ते जाणून घ्या...
स्नॅपचॅट युजर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली असून, स्नॅपचॅट आणि पर्प्लेक्सिटी एकत्र आले आहेत. स्नॅपचॅटच्या मते, पुढील वर्षी, म्हणजेच २०२६ पासून, स्नॅपचॅट युजर्संना त्यांच्या चॅट पर्यायांमध्ये AI एकत्रित केले जाईल, ज्यामुळे ते संवाद साधू शकतील. स्नॅपचॅटचे २५ हून अधिक देशांमध्ये ९४३ दशलक्ष युजर्स आहेत. त्यापैकी मोठ्या संख्येने युजर्स १३ ते ३४ वयोगटातील आहेत. याव्यतिरिक्त असा अहवाल समोर येत आहेत की पर्प्लेक्सिटीचा कॉमेट काही अँड्रॉइड युजर्संसाठी रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे.
स्नॅपचॅटने अद्याप कोणतेही मेजर एआय एकत्रित केलेले नाही. म्हणून एआय टूल्स वापरण्यासाठी युजर्संना अॅपमधून बाहेर पडावे लागेल. ही समस्या आता राहणार नाही. पुढील वर्षापासून, स्नॅपचॅट वापरकर्ते चॅट बॉक्समध्ये परप्लेक्सिटीच्या एआयशी संवाद साधू शकतील. या करारामुळे परप्लेक्सिटी स्नॅपचॅटला $४०० दशलक्ष देईल आणि परप्लेक्सिटीचा वापरकर्ता आधार वाढविण्यास मदत करेल.
स्नॅपचॅटची सर्वात मोठी ताकद म्हणजे तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता. कंपनीचे म्हणणे आहे की, १३ ते ३४ वयोगटातील ७५ टक्क्यांहून अधिक तरुण २५ हून अधिक देशांमध्ये स्नॅपचॅट वापरतात. या करारावर भाष्य करताना, परप्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास म्हणाले की, परप्लेक्सिटीला स्नॅपचॅटमध्ये आणल्याने अॅपमध्ये निर्माण होणारी उत्सुकता पूर्ण होईल. स्नॅपचॅट असेही म्हणतात की यामुळे स्नॅपचॅटवरील शोध अनुभव सुधारेल. “आम्ही भविष्यात अशा अधिक भागीदारांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
असेही वृत्त आहे की, परप्लेक्सिटीचा कॉमेट ब्राउझर काही नोंदणीकृत अँड्रॉइड युजर्संसाठी उपलब्ध होत आहे. हे ब्राउझर आधीच मॅक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. परप्लेक्सिटीचा कॉमेट ब्राउझर गुगलच्या क्रोम ब्राउझरशी स्पर्धा करेल. कॉमेट हा पूर्णपणे एआय ब्राउझर आहे. अँड्रॉइडवर कॉमेटचे आगमन सूचित करते की भविष्यात तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोन आणि टॅबलेटवर वापरू शकाल. जर हे खरोखर घडले तर मोठ्या संख्येने लोक एआय ब्राउझरकडे वळू शकतात.






