6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
कंपनीने आज भारतात HMD Vibe 2 5G स्मार्टफोनचे 6GB+128GB हे नवीन व्हेरिअंट लाँच केले आहे. या व्हेरिअंटची विक्री 16 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र बँक ऑफर्ससह हे स्मार्टफोन व्हेरिअंट कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लाँच ऑफरअंतर्गत ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट उद्या केवळ 14,999 रुपयांत खरेदी करू शकतात. तर कंपनीचं असं म्हणण आहे की, 4GB+128GB व्हेरिअंट तुम्ही 12,999 रुपयांत खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – HMD)
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, HMD Vibe 2 5G मध्ये 6.745-इंच एचडी+ 120Hz एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 2.3GHz पर्यंत युनिसॉक T8200 6nm प्रोसेसर, माली-जी57 एमसी2 जीपीयू देखील मिळणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 4GB / 6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम पर्याय आणि ऑप्शन आणि 64GB / 128GB स्टोरेज पर्यायात खरेदी करू शकतात.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा, सेकेंडरी कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, 3.5 mm ऑडियो जॅक, बॉटम-पोर्टेड स्पीकर आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग देखील मिळणार आहे.
कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G SA/NSA (n1/3/5/8/28/40/77/78 बँड), डुअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.0, जीपीएस + ग्लोनास, यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळणार आहेत. या डिव्हाईसमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.






