BSNL ची नवी ऑफर! डेली 2GB हाय-स्पीड डेटासह मिळणार हे धमाकेदार फायदे... खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये
कंपनी यावेळी नवीन यूजर्ससाठी खास प्रीपेड प्लॅन घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना केवळ 51 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 2GB डेटा ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजेच यामध्ये नवीन सिम कार्ड देखील मोफत मिळणार आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. कारण कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नवीन ऑफरबाबत माहिती देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करत कंपनीने म्हटलं आहे की, एकच सिम. सर्व आवश्यक सुविधा. अमर्यादित कॉलिंग, दररोज हाय-स्पीड डेटा, एसएमएस सुविधा आणि सुरुवात करण्यासाठी मोफत बीएसएनएल सिम. ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत वैध आहे.
या प्लॅनची किंमत केवळ 51 रुपये आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. ज्यामुळे दिवसरात्र कॉलवर बोलू शकता. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. यामुळे लवकर डेटा संपण्याची चिंता देखील राहणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहेत.
One SIM. All the essentials. Unlimited calling, daily high-speed data, SMS benefits, and a FREE BSNL SIM to get you started. Offer valid till 30th June 2026#BSNLIndia #CALLS #SMS #Validity #rechargeable #services #INTERNET #networking @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/chpHyMzc4g — BSNL India (@BSNLCorporate) June 12, 2026
हा प्लॅन कंपनीने त्यांच्या बजेट फ्रेंडली यूजर्सना लक्षात घेऊन डिझाईन केला आहे. या प्लॅनची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे आणि प्लॅनमध्ये ऑफर केले जाणारे फायदे अतिशय जबरदस्त आहेत. त्यामुळे जर तुम्ही बीएसएनएल यूजर असाल तर या प्लॅनची खरेदी करणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे, कारण ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध आहे.
या ऑफरअंतर्गंत, टेलीकॉम कंपनी एक फ्री सिम कार्ड देखील देणार आहे. हे सिम कार्ड तुम्ही बीएसएनएल कस्टमर सर्विस सेंटर किंवा अधिकृत रिटेलरकडून घेऊ शकता. सिम घेण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे.






