काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच खाली होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा
स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवूणक करण्यासाठी शेकडो मार्ग शोधले आहेत. जोपर्यंत लोकांना एका स्कॅमच्या पद्धतीबाबत सावध केल जात असतं, तोपर्यंत स्कॅमर्स लोकांची फसवूणक करण्यासाठी दुसरी पद्धत अॅक्टिव्हेट करतात. डिजीटल स्कॅम, डिजीटल अरेस्ट, सायबर फ्रॉड, व्हिडीओ कॉल, ओटीपी स्कॅम, एटीएम स्कॅम अशा अनेक पद्धतींनी आतापर्यंत लोकांची फसवूणक केली जात होती. मात्र आता स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट आयव्हीआर कॉल ही पद्धत सुरु केली आहे.
स्कॅमर्सनी बनावट इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR) स्कॅमद्वारे लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, IVR ही एक स्वयंचलित फोन प्रणाली आहे. हे टेलिकॉम कंपन्या आणि बँका इत्यादींद्वारे वापरले जाते. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्समध्ये युजर्सना “भाषा निवडण्यासाठी 1 दाबा” किंवा “बँक बॅलन्स माहितीसाठी 2 दाबा” इत्यादी कमांड किंवा कीपॅड इनपुटवर सेवा प्रदान केल्या जातात. मात्र आता याच पद्धतीचा वापर करून सामान्य लोकांची फसवूणक केली जात आहे. अशाच एका स्कॅममधून बंगळुरुमध्ये एका महिलेने 2 लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे लोकांनी अशा कॉल्सपासून सावध राहणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलिकडेच बेंगळुरूमध्ये एका महिला स्कॅमर्सच्या बनावट आयव्हीआर घोटाळ्यात अडकली आणि या घटनेत तिचे तब्बल 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. खरंतर, त्या महिलेला तिच्या बँकेच्या आयव्हीआरसारखा कॉल आला. या कॉलमध्ये तिला सांगण्यात आले की तिच्या खात्यातून 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जात आहेत. हा व्यवहार थांबवण्यासाठी, महिलेला एक बटण दाबण्यास सांगण्यात आले. तिने बटण दाबताच तिच्या खात्यातून 2 लाख रुपये स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झाले. महिलेने याबद्दल बँक आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बनावट आयव्हीआर कॉल ओळखणे खूप सोपे आहे. खरं तर, खऱ्या आयव्हीआर दरम्यान, तुम्हाला कधीही ओटीपी आणि पासवर्ड सारखी संवेदनशील माहिती विचारली जाणार नाही. जर कोणी तुम्हाला अशी संवेदनशील माहिती विचारत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय, स्कॅमर तुमच्यावर घाई करण्यासाठी दबाव आणतील, परंतु हे प्रत्यक्ष कॉलमध्ये केले जात नाही. तसेच, बनावट आयव्हीआर कॉलद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. कॉल दरम्यान तुम्हाला काही संशयास्पद हालचाली जाणवल्यास, कॉल ताबडतोब डिस्कनेक्ट करा.