Tech News: हायरच्या वॉशिंग मशीनमध्ये अल्ट्रा फ्रेश एअर टेक्नॉलॉजीचा समावेश; धुतलेले कपडे कायमच राहतील ताजेतवाने
प्रत्येक घरात कपडे स्वच्छ धुवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. कामाच्या धावपळीमध्ये कपडे धुवण्यासाठी किंवा घरातील इतर कामे करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी वॉशिंग मशीनचा वापर करणे उत्तम पर्याय आहे. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. पण हायरने आपली नवीन वॉशिंग मशीन सिरीज, हायर एफ११ सादर केली आहे. कंपनीने ही मशीन जवळपास प्रत्येक वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली आहे. कंपनीच्या मते, ही मशीन दुर्गंधी टाळते, डिटर्जंटचा अपव्यय टाळते, कपडचांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि वापरण्यास सोप्या प्रणालीने सुसज्ज आहे, यात अनेक एआय-आधारित वैशिष्ट्ये आहेत.(फोटो सौजन्य – istock/ AI)
Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी ‘या’ फोल्डेबल फोनला करणार ‘Good Bye’? कारण काय? जाणून घ्या
कंपनीने ही मशीन दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे. सुरुवातीला, ही १२ किलो क्षमतेसह सादर करण्यात आली होती. एका प्रकारात वॉशर आहे आणि दुसऱ्या प्रकारात वॉशर-ड्रायर आहे. १२ किलो क्षमतेच्या प्रकारात वॉशर आणि ड्रायर समाविष्ट आहेत. ही मशीन एआय-शक्तीवर चालणाऱ्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि लोड आपोआप ओळखून हाताळू शकते.
मशीनमध्ये खास अल्ट्रा फ्रेश एअर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यात एआय कलर टच पॅनलची सुविधा देखील आहे. या वॉशिंग मशीनमध्ये स्मार्टवॉश फंक्शन्ससुद्धा आहेत, याचे फ्रेश एअर तंत्रज्ञान ड्रममध्ये ताजी हवा फिरवते, ज्यामुळे कपडे धुतल्यानंतर १२ तासांपर्यंत ताजे राहतात.कपड़े मशीनमध्ये राहिले तरी त्यांना दुर्गंधी येत नाही. याची एआय वन-टच वॉश सिस्टीम कपड्यांचे प्रमाण ओळखते आणि माती, कॉफी, दूध आणि धाम यांसारख्या हट्टी डागांनुसार तुम्हाला वॉश सायकल सेट करण्याची परवानगी देते.
मशीनची इंटेलिजेंट सिस्टीम आवश्यक डिटर्जंटचे प्रमाण ठरवते आणि कपड्यांच्या प्रमाणानुसार डिटर्जंटचे प्रमाण समायोजित करते. यात इन्स्टंट डिसॉल्व प्रीमिक्स आणि ३डी पॉवर स्प्रेची सुविधा देखील आहे. ही सिस्टीम डिटर्जंटला पाण्यात कार्यक्षमतेने विरघळवते आणि थेट कपड्यांवर फवारते, ज्यामुळे खोलवर स्वच्छता होते.






