नवीन वर्षात एंट्री करणार 'OPPO' ची ही सिरीज, अनोख्या डिजाइनिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी OPPO ने नोव्हेंबर 2024 मध्ये चीनमध्ये OPPO Reno 13 सिरीज लाँच केली आहे. या लाँचिंगनंतर आता कंपनी ही सिरीज भारत आणि जागतिक बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षात OPPO Reno 13 सिरीज भारतात एंट्री करणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. OPPO ने दुजोरा दिला आहे की, OPPO Reno 13 सिरीज जानेवारी 2025 मध्ये भारतात लाँच केली जाणार आहे. आता कंपनीने या सिरीजमधील डिझाईन आणि कलर ऑप्शनबद्दल माहिती शेअर केली आहे. OPPO Reno 13 सिरीज डिजाइनिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज असणार आहे.
OPPO Reno 13 सिरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत, यातील एक बेस व्हेरिअंट आणि दुसरा प्रो मॉडेल असणार आहे. Oppo Reno 13 Pro मॉडेल ग्रेफाइट ग्रे आणि मिस्ट लॅव्हेंडर रंगात लाँच केला जाणार आहे. तर Reno 13 Ivory White आणि ल्यूमिनस ब्लू या कलर पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे. ग्रेफाइट ग्रे आणि ल्युमिनस ब्लू मॅट फिनिशसह येतील, तर इतर दोन रंग ग्लॉसी लुकसह येतील. या कलर पर्यायांमध्ये या नवीन सिरीजला एक क्लासी लूक मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
ओप्पोचा दावा आहे की त्यांनी ग्लॉसी फिनिशसाठी ग्रेस्केल एक्सपोजर लेझर डायरेक्ट रायटिंग नावाच्या डिझाइनिंग टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. ल्युमिनस ब्लू व्हेरिएंट कॅमेरा मॉड्यूलच्या आसपास एक ग्लोइंग इफेक्ट देतो. बिल्ड क्वालिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेम असेल. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी, गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण उपलब्ध असेल. डिस्प्लेचे इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र कंपनी लवकरच याबाबत माहिती शेअर करेल असं सांगितलं जात आहे.
कंपनीने सांगितले की Reno 13 Pro मॉडेल 1.62mm बेझल्स आणि 93.8% स्क्रीन-टू-बॉडी रेशोला सपोर्ट करेल. त्याच वेळी, Reno 13 मॉडेल 1.81mm बेझल आणि 93.4% स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह येईल. दोन्हीमध्ये ओलेड पॅनेल असतील. Reno 13 सिरीजला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी, IP66 (Splash) + IP68 आणि IP69 असे रेटिंग असेल.
Oppo Reno 13 Pro सुद्धा काही दिवसांपूर्वी गीकबेंचवर लिस्ट झाला होता. त्याचा मॉडेल क्रमांक CPH2697 आहे. या स्मार्टफोनला सिंगल कोअर टेस्टमध्ये 1301 आणि मल्टी-कोअर टेस्टमध्ये 3930 गुण मिळाले आहेत. हे सूचित करते की फोन MediaTek Dimension 8350 प्रोसेसरसह लाँच केला जाणार आहे. यात Android 15 ऑपरेटिंग सिस्टम असेल, जी कंपनीच्या ColorOS सोबत काम करेल.
Familiar, yet so refreshingly new. Can you guess what’s coming? 👀#OPPOReno13Series #OPPOAIPhone pic.twitter.com/Vp7pH19taX — OPPO India (@OPPOIndia) December 23, 2024
OPPO Reno 13 Pro फोनमध्ये 6.83 इंच कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असेल, जो 120 Hz च्या रीफ्रेश रेट आणि 1200 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. सेल्फीसाठी यात 50MP लेन्स दिली जाऊ शकते. यासोबत, या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5800 mAh बॅटरी असेल.
डबल धमाका! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Apple चा हा iPhone; 14 मिनिटांत होणार डिलीवरी, काय आहे ऑफर?
OPPO Reno 13 स्मार्टफोनमध्ये लहान डिस्प्ले आणि बॅटरी असेल. फोनमध्ये 5600 mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. हे 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज सपोर्टसह लाँच केला जाऊ शकतो.