पासवर्ड लीक होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणं! स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
अलीकडेच जगभरातील सर्वात मोठ्या हॅकर अटॅकबाबत माहिती समोर आली होती. या घटनेत गुगल आणि फेसबूक युजर्सचे 16 अब्जांहून अधिक पासवर्ड लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. याशिवाय युजर्सचा डेटा आणि ऑनलाईन सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. कारण बँकिंग, सोशल मीडिया, ईमेल यासह इतर अकाऊंटचे पासवर्ड लीक झाल्याने युजर्स अडचणीत सापडले होते. हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून युजर्सचे पासवर्ड आणि डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. आता आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून हॅकर्स युजर्सचे पासवर्ड आणि डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत
युजर्सचा डेटा चोरण्याची फिशिंग ही सर्वात सामान्य पद्धत आहे. यामध्ये हॅकर्स नकली ईमेल, वेबसाइट किंवा मेसेज करून युजर्सना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात आणि युजर्सची माहिती चोरतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एक असा ईमेल येऊ शकतो जो तुमच्या बँक किंवा सोशल मीडिया साइटसारखा दिसतो आणि पासवर्ड रीसेट किंवा पडताळणीसाठी विनंती करतो. जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता आणि पासवर्ड एंटर करता तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते.
अनेकदा हॅकर्स मोठ्या कंपन्यांच्या सर्वरवर हल्ला करतात आणि लाखो युजर्सची माहिती चोरतात. यामध्ये ईमेल, यूजरनेम आणि पासवर्ड अशा महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असतो. जर तुम्ही अशा वेबसाइटवर खाते तयार केले असेल ज्याचे उल्लंघन झाले असेल, तर तुमचा पासवर्ड देखील लीक होऊ शकतो.
हा एक प्रकारचा मालवेअर असतो. हे तुम्ही कीबोर्डवर टाईप करत असलेली सर्व माहिती रेकॉर्ड करते. जेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड एंटर करतात, तेव्हा कीलॉगर ही माहिती चोरतो आणि हॅकरपर्यंत पोहोचवतो. अशा घटना सहसा स्पॅम लिंक, संक्रमित वेबसाइट किंवा थर्ड-पार्टी सॉफ्टवेयरद्वारे घडतात. हा मालवेअर थर्ड पार्टी सॉफ्टवेअरद्वारे तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो.
या पद्धतीमध्ये हॅकर्स युजर्सच्या पासवर्डचा अंदाज लावतात आणि कॉम्बिनेशनचा विचार करतात. सोपे आणि सामान्य पासवर्ड (जसे की 123456 किंवा password123) ब्रूट फोर्स हल्ल्यात सहजपणे तुटतात. म्हणूनच मजबूत पासवर्ड असणे खूप महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही पब्लिक वाय – फायचा वापर करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरून ट्रान्सफर केलेला डेटा हॅकर्सपर्यंत अगदी सहजपणे पोहोचतो.