Vi Recharge Plan: 100 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... डेटा ऑफर्समुळे ग्राहक खुश; Jio-Airtel ला देणार टक्कर
ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्सना आकर्षित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी कंपनी या डेटा प्लॅनमध्ये यूजर्सना लिमिटेड डेटा ऑफर करत होती. मात्र फायद्यांमध्ये बदल करण्यात आले असून हा प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या बदलांमुळे आता हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी ‘वॅल्यू फॉर मनी’ डील ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vi च्या 99 रुपयांच्या डेटा वाऊचरवर फेयर यूसेज पॉलिसी लागू केली जाते. याचा अर्थ असा आहे की, एका मर्यादित कमर्शियल लिमिटपर्यंत सुपरफास्ट स्पीड मिळणार आहे. यानंतर स्पीड थोडी कमी होणार आहे. यामुळे नेटवर्क स्टेबल राहते आणि कोणत्या एका यूजरमुळे क्षेत्रातील दुसऱ्या यूजर्सच्या इंटरनेट स्पीडवर कोणताही परिणाम होत नाही. तुम्ही जर हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की, तुम्ही फक्त हाच प्लॅन खरेदी करू शकत नाही. यासाठी तुमच्या फोनमध्ये दुसरा प्लॅन अॅक्टिव्ह असणं अतिशय गरजेचे आहे. तुमच्या बेस प्लॅनची व्हॅलिडीटी संपली असेल तर तुम्ही अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकत नाही. ज्या यूजर्सना प्रवासात डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी हा प्लॅन अतिशय फायद्याचा ठरणार आहे. तसेच व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगसाठी देखील हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
Aaple Sarkar Portal: ‘आपले सरकार’ पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली
हा प्लॅन अॅक्टिव्हेट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. तुम्ही Vi च्या मोबाईल अॅपद्वारे तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकतात. या अॅपमधील डेटा सेक्शनमध्ये तुम्हाला 99 रुपयांचा डेटा व्हाऊचर पर्याय मिळणार आहे. डेटा व्हाऊचर खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी तुम्ही यूपीआय, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकणार आहात. तुम्ही पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये अनलिमिटेड डेटा अॅड होणार आहे.






