फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अॅक्सेस... असा घडतोय Scam
Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
अशा प्रकारच्या स्कॅमची सुरुवात सहसा मेसेजने होते. स्कॅमर व्हॉट्सअॅप, एसएमएस, ईमेल किंवा सोशल मीडियाद्वारे लोकांना मेसेज पाठवतात, लिंक पाठवतात आणि टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा एखादा यूजर स्कॅमरच्या जाळ्यात अडकून त्या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या फोनमध्ये मालवेयर इंस्टॉल होतो. एकदा मालवेयर इंस्टॉल झाला की तुमच्या फोनचा संपूर्ण कंट्रोल स्कॅमरकडे जातो. यानंतर स्कॅमर्स तुमच्या फोनवर येणारे सर्व मेसेज आणि ओटीपी पाहू शकतात.
मुंबईत घडलेल्या घटनेमध्ये देखील स्कॅमर्सनी संबंधित व्यक्तीच्या फोनचा संपूर्ण अॅक्सेस मिळवला आणि त्यानंतर फोन रिसेट केला आणि पैसे ट्रांसफर करून घेतले. यामुळे फोनमधील सर्व अॅप्स आणि डेटा गायब झाला. जेव्हा यूजरने फोन चालू करून पाहिले तर सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर फ्रॉड आणि स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्सनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा छोटा निष्काळजीपणा देखील मोठ्या नुकसानासाठी कारणीभुत ठरू शकतो.
अँड्रॉईड यूजर्सची स्कॅमपासून सुरक्षा व्हावी यासाठी गूगल एक नवीन फीचर रोलआउट करण्याचे प्लॅनिंग करत आहे. खोट्या आणि स्कॅम कॉल्सची ओळख पटवून हे फीचर यूजर्सची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा एखादा स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या जवळील व्यक्ती असल्याचा दावा करत असेल तर अशावेळी हे फीचर तुम्हाला स्कॅमरची खरी ओळख सांगणार आहे. तुम्हाला वॉर्निंग मिळाल्यावर तुम्ही कॉल डिस्कनेक्ट करू शकाल. हे वैशिष्ट्य सर्वप्रथम पिक्सेल डिव्हाइसेसवर उपलब्ध होत आहे.
Ans: ऑटो रिसेट फ्रॉड हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यामध्ये स्कॅमर्स फोन किंवा अकाउंट रीसेट प्रक्रियेचा गैरवापर करून यूजरची माहिती किंवा अकाउंट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात.
Ans: फसवणूक करणारे बनावट लिंक, फेक कॉल किंवा OTP मिळवून डिव्हाइस किंवा अकाउंट रीसेट करण्याचा प्रयत्न करतात.
Ans: बँकिंग तपशील, सोशल मीडिया अकाउंट्स, ई-मेल, कॉन्टॅक्ट्स आणि वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.






