WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य
रिपोर्ट्सनुसार, हे फीचर सध्या बीटा वर्जनमध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे. येणाऱ्या काही महिन्यात हे फीचर सर्व युजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. WhatsApp च्या नव्या फीचरबाबत माहिती देणारी वेबसाईट WABetaInfo ने सांगितलं आहे की, कव्हर फोटो ऑप्शन प्रोफाइल सेटिंग्समध्ये उपलब्ध असणार आहे. हे फीचर फोटोच्यावर एक मोठी ईमेज लावण्याची सुविधा देणार आहे.
हे फीचर फेसबुक, लिंक्डइन किंवा एक्सवर उपलब्ध असलेल्या फीचरप्रमाणेच काम करणार आहे.यूजर्स हा कव्हर फोटो त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्सच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकणार आहेत. म्हणजेच तुम्ही ठरवू शकता की तुमचा कव्हर फोटो कोण पाहू शकतं आणि कोण नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या हे फीचर WhatsApp Android बीटा वर्जनमध्ये काही निवडक युजर्ससाठी टेस्ट केले जात आहे. येणाऱ्या काळात हे फीचर इतर युजर्ससाठी देखील उपलब्ध होणार आहे. खरंतर, हे फीचर WhatsApp बिझनेस प्रोफाइलसाठी आधीच उपलब्ध आहे पण आता कंपनी ते सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे.
WhatsApp मधील हा बदल या गोष्टीचा संकेत आहे की, Meta त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर हळूहळू एक सारखा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे. मेटा यूजर्सना फेसबुक, इंस्टाग्राम आणि WhatsApp वर समान दृश्य आणि इंटरफेस अनुभव देण्याची योजना आखत आहे.
WhatsApp वर एकाच फोन नंबरवर दोन अकाउंट चालवता येतात का?
एकाच नंबरवर फक्त एकच WhatsApp अकाउंट वापरता येते, पण “Dual Apps” फीचर असलेल्या फोनमध्ये दोन WhatsApp चालवू शकता.
डिलीट केलेले WhatsApp मेसेज पुन्हा पाहता येतात का?
नाही, अधिकृतरित्या WhatsApp डिलीट केलेले मेसेज परत दाखवत नाही, पण काही थर्ड-पार्टी अॅप्स नोटिफिकेशन हिस्ट्रीमधून मेसेज दाखवू शकतात असा दावा केला जातो.
WhatsApp बॅकअप Google Drive शिवाय घेता येतो का?
होय, तुम्ही लोकल बॅकअप (फोन स्टोरेजमध्ये) घेऊ शकता आणि तो मॅन्युअली ट्रान्सफर करू शकता.






