Xiaomi ने लाँच केला नवा टॅब्लेट, 50MP कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक कंपनी Xiaomi ने लेटेस्ट टॅब्लेट Xiaomi Pad 7S Pro लाँच केला आहे. हा टॅब्लेट Pad 6S Pro चा सक्सेसर आहे. याबाबत कंपनीने घोषणा देखील केली आहे. Xiaomi Pad 7 सिरीजमधील दोन गॅझेट Pad 7 Ultra आणि Xiaomi Pad 7 Pro आधीच लाँच करण्यात आले आहेत. नवीन डिव्हाईस Xiaomi Pad 7S Pro देखील यामध्ये जोडले जाणार आहे. या वर्षीच्या मॉडेलचे मुख्य आकर्षण म्हणजे Xiaomi चा इन-हाऊस XRING O1 प्रोसेसर. याशिवाय, अनेक लहान अपग्रेड देखील आहेत. नवीन डिव्हाईस अनेक रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे.
Xiaomi Pad 7S Pro ची किंमत बेस मॉडेल 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी CNY 3,300 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. हे डिव्हाईस 8GB, 12GB आणि 16GB या रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. 16GB रॅम+ 1TB स्टोरेज ऑप्शनची किंमत CNY 4,500 म्हणजेच सुमारे 53,000 रुपये आहे. हा टॅबलेट काळा, जांभळा, टायटॅनियम सिल्व्हर आणि बेसाल्ट ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचा मॅट ग्लास व्हर्जन देखील आहे, जो फक्त काळ्या रंगात आणि 12GB + 512GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB पर्यायांमध्ये येईल. (फोटो सौजन्य – X)
Xiaomi Pad 7S Pro मध्ये 12.5-इंच IPS LCD पॅनल आहे, ज्यामध्ये 2,136 x 3,200 पिक्सेल्स आणि 3:2 आस्पेक्ट रेशियो देण्यात आला आहे. पॅनल 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. यामध्ये ‘सॉफ्ट लाइट’ नावाचे मॅट ग्लास वर्जन देखील आहे, जो मॅट स्क्रीन प्रोटेक्टरसह येतो. Pad 7S Pro डिव्हाईस Xiaomi च्या XRING O1 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 3nm प्रोसेसने बनला आहे आणि 3.4GHz ची मॅक्सिमम क्लॉक स्पीड देतो. टॅब्लेटमध्ये 8GB आणि 12GB व्हेरिअंट्साठी LPDDR5X रॅम आणि 16GB व्हेरिअंटसाठी LPDDR5T रॅमसह लाँच करण्यात आले आहे. स्टोरेज 1TB पर्यंत UFS 4.1 आहे.
तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता
मागील बाजूस f/1.8 अपर्चर आणि PDAF असलेला 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंट-फेसिंग कॅमेरा f/2.2 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सेल युनिट आहे. Pad 7S Pro अँड्रॉइड 15 आधारित शाओमीच्या HyperOS 2 सॉफ्टवेअरवर चालतो. या डिव्हाईसमध्ये 10,610mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W वायर्ड चार्जिंग आणि 7.5W रिवर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कम्युनिकेशनसाठी USB Type-C पोर्ट (USB 3.2 Gen 1), Wi-Fi 7, आणि Bluetooth 5.4 आहे. मागील मॉडेलप्रमाणेच, Xiaomi Pad 7S Pro मध्ये Xiaomi Pad 7S Pro फोकस कीबोर्ड, Xiaomi Pad 7S Pro कीबोर्ड, Xiaomi Focus Pen आणि Xiaomi Pad 7S Pro कव्हर यासारख्या पर्यायी अॅक्सेसरीजचा संच आहे.