अतिवृष्टीमुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे सर्वसाधारण 722.5 मिमीचा पाऊस झाला - बीड, नांदेड, लातूर, धरणशिव अशा जिल्ह्यांमध्ये खतदार पिके, मातीचा घाणक, शेतजमीन व पशुधन हे मोठ्या प्रमाणात…
कवडीमोलात भात खरेदी होत आहे आणि त्यामुळे किसान अॅपद्वारे आता तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करण्यात येणार आहे. केंद्राकडे आता नोंदणी करण्यात येणार नाही. वाचा सविस्तर महत्त्वाची माहिती
सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
तासगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि पहाटेच्या धुक्यामुळे द्राक्षबागांवर गंभीर संकट ओढावले आहे.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या…
PM Kisan चा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हफ्त्याचे २००० रु. मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी काय प्रकिया आहे ती खाली जाणून घेऊया..
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी रुपये देऊ केले आहेत. यावर शेतकऱ्यांचा काय आक्षेप आहे? पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या भरपाई रकमेशी शेतकरी सहमत नाहीत.
सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच शासनाकडून मिळालेल्या फक्त दोन रुपये तीस पैशांच्या नुकसानभरपाईमुळे पालघरमधील शेतकरी संतप्त झाले आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते…
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
सामूहिक शेततळ्यांसाठी ७६ टक्के आणि जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी मंडळ तथा एनएचएमचे संचालक अशोक किरनल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.