• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Farmers In Khed Taluka Are In Trouble Due To The Falling Market Price Of Potatoes

खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत

थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2026 | 03:47 PM
खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग
  • घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत
  • १० हजार हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड
राजगुरुनगर : खेड तालुक्यात रब्बी हंगामातील बटाटा काढणीला सध्या मोठा वेग आला आहे. थंडीचे पोषक वातावरण लाभल्याने यंदा बटाट्याचे पीक जोमात आले आहे. उत्पादन आणि गळीत समाधानकारक असले तरी बाजारात मिळणारा अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे. खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव अपुरा ठरत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

खेड तालुक्यात रब्बी हंगामात बटाटा हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. तालुक्यातील भीमा व भामा नदीकाठचा भाग तसेच चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर आधारित परिसरात मोठ्या प्रमाणावर बटाटा व कांद्याची लागवड केली जाते. यंदा सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड झाली. अडीच ते तीन महिन्यांपूर्वी लावलेले पीक आता काढणीच्या टप्प्यात आले आहे. शेतकरी मजूर, यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने जोमाने काढणी करताना दिसत आहेत.

कोहिनकरवाडी (ता. खेड) येथील शेतकरी बाळासाहेब बाबूराव कोहिनकर यांनी सांगितले की, “यंदा थंडीचे प्रमाण योग्य राहिल्याने बटाट्याचे पीक दर्जेदार झाले आहे. उत्पादनही अपेक्षेपेक्षा चांगले मिळाले; मात्र बाजारभाव अत्यंत कमी असल्याने नफा तर दूरच, उलट नुकसान सहन करावे लागत आहे.” बटाटा लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक असा मोठा भांडवली खर्च येतो. काढणीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाव आपोआप घसरतात, ही दरवर्षीचीच समस्या असल्याचे शेतकरी सांगतात.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो

सध्या बटाट्याला ८ ते १० रुपये प्रतिकिलो (क्विंटलमागे सुमारे ८०० ते १००० रुपये) असा दर मिळत असून, रब्बी हंगामातील नवीन आवक वाढल्याने दरांवर आणखी दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारणीची नितांत गरज शेतकरी व्यक्त करत आहेत. खेड बाजार समितीच्या माध्यमातून सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शीतगृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शेतकरी तसेच सातकरस्थळचे माजी सरपंच मारुती सातकर यांनी दिली. ही योजना प्रत्यक्षात आली तर भविष्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधारणा करण्याची मागणी

दरम्यान, बटाटा उत्पादक शेतकरी गणेश कोहिनकर यांनीही योग्य बाजारभाव, साठवणूक सुविधा आणि बाजार व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. “उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढतेच असे नाही. त्यासाठी बाजारातील नियोजन, दर स्थैर्य आणि साठवणूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. भरघोस उत्पादन असूनही कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या खेड तालुक्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना शीतगृहासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांकडे आता मोठ्या अपेक्षेने पाहावे लागत आहे.

Web Title: Farmers in khed taluka are in trouble due to the falling market price of potatoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Khed

संबंधित बातम्या

भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन
1

भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?
2

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

कुरकुंभ एमआयडीसीत केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 जणांना ठोेकल्या बेड्या
4

कुरकुंभ एमआयडीसीत केबल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 जणांना ठोेकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Ahilyanagar News: मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला! खासदार लंके यांची एकाकी लढत

Ahilyanagar News: मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला! खासदार लंके यांची एकाकी लढत

Jan 12, 2026 | 07:03 PM
RCB W vs UPW W LIVE SCORE : RCB ने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! UP वॉरियर्स करणार फलंदाजी 

RCB W vs UPW W LIVE SCORE : RCB ने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! UP वॉरियर्स करणार फलंदाजी 

Jan 12, 2026 | 07:03 PM
वचननामा, संकल्पनाम्याचे राजकारण! कोणाच्या विकास पुस्तिकेवर ‘विश्वास’ दाखवायचा? मतदारांना प्रश्न

वचननामा, संकल्पनाम्याचे राजकारण! कोणाच्या विकास पुस्तिकेवर ‘विश्वास’ दाखवायचा? मतदारांना प्रश्न

Jan 12, 2026 | 06:50 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
‘Dhurandhar’ ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर, अवघे ६.५० कोटी बाकी, साऊथचे चित्रपटही पडतील मागे

‘Dhurandhar’ ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर, अवघे ६.५० कोटी बाकी, साऊथचे चित्रपटही पडतील मागे

Jan 12, 2026 | 06:42 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.