चंद्रभागेच्या तिरावर सुरक्षेसाठी हायॲलर्ट! आराखडा तयार; वारीसाठी १७ रेस्क्यू बोटींसह यंत्रणा सज्ज
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदी आणि पालखी मार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक वारीत तैनात करण्यात येणार असून, आपत्कालीन प्रतिसादासाठी अत्याधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी सहा अग्निशमन वाहने आणि एक रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनची जबाबदारी पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संभाजी कारले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)
‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रभागा नदीतील प्रवासी होड्यांसाठी १,०४५ लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. वारीदरम्यान बचावकार्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११, पुणे जिल्ह्यातील २ आणि एनडीआरएफच्या ४ अशा एकूण १७ रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, वॉकी-टॉकी, मेगाफोन, इन्फ्लेटेबल टेंट, रेस्क्यू रोप, टॉर्च, लेझर पॉइंटर आणि लाईट बॅटनसह आवश्यक साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे समन्वयक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आहेत.
यंदाच्या आषाढी वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे स्वतंत्र महिलांचे बचाव पथक प्रथमच कार्यरत राहणार आहे. या पथकाने यापूर्वी सीना नदीच्या पुरात सुमारे ३०० नागरिकांचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीतही या पथकाने प्रभावी बचावकार्य केले आहे. बोट ॲम्ब्युलन्सचीही तयारीरेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट अॅम्ब्युलन्स सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीपात्र आणि घाट परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क राहणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.
तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले
चंद्रभागा नदीत गस्त आणि बचाव कार्यासाठी १८० प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एनडीआरएफ, विविध जिल्ह्यांतील आपदा मित्र, स्वयंसेवी बचाव संस्था, स्थानिक होडीवाले, महिला रेस्क्यू पथक आणि पोलिस पाटील यांचा समावेश आहे. वारीच्या काळात रेस्क्यू बोटीची तत्काळ दुरुस्ती करता यावी, यासाठी दोन मेकॅनिकही पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत.






