(फोटो सौजन्य: Pinterest)
Pune Coffee Culture: कटिंग चहा ते कोल्ड ब्रू… पुण्यात रंगतंय ‘कॉफी कल्चर’!
ठाणे
ठाण्यातील पेशवेकालीन मंदिर २०५ वर्षे जुने असून, रेल्वे स्थानकापासून १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हे मंदिर इ.स. १८१८मध्ये (पेशवेकाळात) पंडित कुटुंबाने बांधले होते.
कोल्हापूर
कोल्हापूरपासून १२ किमीवर असलेले नंदवाळ येथे प्रसिद्ध श्रीविठ्ठल मंदिर आहे. या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. ‘करवीर माहात्म्य ग्रंथात केलेल्याउल्लेखात श्रीविठ्ठल रोज रात्री या ठिकाणी वास्तव्यासाठी येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
औंध
औंध येथील श्रीविठ्ठलाचे मंदिर सुमारे २८५ वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात बांधण्यात आले आहे. आषाढीला या मंदिरात लाखो भाविक गर्दी करतात.
अमरावती
आषाढीला विदर्भातील लाखो भाविक श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील कौडिण्यपूर येथील मंदिरात येतात. कौडिण्यपूर हे माता रुक्मिणीचे माहेरघर असल्याचे म्हटले जाते.
Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
वडाळा
वडाळ्याचे श्रीविठ्ठल मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे आहे. वडाळा मिठागरांसाठी ओळखले जायचे. बहुतेक लोक मिठाचा व्यापार करायचे. एकदा काम करताना मिठागरात त्यांना श्रीविठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी ही गोष्ट पंढरपूरला जाऊन श्रीतुकाराम महाराजांना सांगितली. तेव्हा महाराजांनी या मूर्तीची तेथेच स्थापना करण्याचा सल्ला दिला. वापऱ्यांनी या मंदिरांची स्थापना केली.






