Maharashtra Breaking News Updates Today
नवी दिल्ली:
नीट पेपरफुटीविरोधात (NEET Paper Leak) तब्बल २६ दिवस अन्नत्याग करून उपोषण (Hunger Strike) करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. उपोषण मागे घेतल्यावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला आणि त्यांना ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत तीव्र शब्दांत सडेतोड उत्तर दिले आहे.
व्हिडिओमध्ये अत्यंत संताप व्यक्त करत सोनम वांगचुक यांनी प्रश्न उपस्थित केला.
“२६ दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणानंतरही मला काय सिद्ध करायचे आहे? मी उपोषण सोडल्याबद्दल माझ्यावर इतके प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? तब्बल २६ दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझ्या या पवित्र आंदोलनाबद्दलची प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का? जर मला सरकारशी तडजोडच करायची असती, तर एवढे दिवस उपोषण करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता.”
25 Jul 2026 06:14 PM (IST)
India Vs Zimbabwe 2nd T20 series Live: सध्या हरारे येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी 20 सामना सुरू आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र इशान किशनच्या जबरदस्त आक्रमक खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेची दाणादाण उडवली आहे. आता मालिकेत बरोबरी करण्यासाठी झिम्बाब्वेच्या संघाला220 रन्सची गरज असणार आहे.
25 Jul 2026 06:07 PM (IST)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा करत या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची भूमिका असल्याचे सांगितले. आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
25 Jul 2026 05:58 PM (IST)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा दावा करत या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेची भूमिका असल्याचे सांगितले. आंदोलक विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
25 Jul 2026 05:48 PM (IST)
मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इमारतीला अंतिम ‘फायर एनओसी’ (अग्निशमन ना हरकत दाखला) देताना गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चिपाडे यांनी सादर केलेला खुलासा प्रशासनाने अमान्य केला असून, त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
25 Jul 2026 05:36 PM (IST)
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेती ज्युडोपटू तुलिका मान हिला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) तात्पुरते निलंबित केले आहे. यामुळे, ती ग्लासगो येथील राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा तिच्या निवासाची माहिती दाखल करण्यात ( Whereabout) अयशस्वी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
25 Jul 2026 05:23 PM (IST)
रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील रणसंग्राम आता एका अत्यंत निर्णायक आणि भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या नव्या टप्प्यात भूमीवरील थेट सैनिकी चकमकींपेक्षा ‘ड्रोन वॉरफेअर’ (Drone Warfare) युद्धभूमीचे भविष्य ठरवत आहे. रशियाच्या अंतर्गत लष्करी तळांवर, इंधन साठ्यांवर आणि लॉजिस्टिक्स केंद्रांवर एकापाठोपाठ एक यशस्वी हल्ले चढवल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक मोठी लष्करी घोषणा केली आहे. युक्रेन सैन्य आपल्या लांब पल्ल्याच्या ड्रोन तंत्रज्ञानाचा अतिशय वेगाने विस्तार करत असून, आगामी काळात थेट १०,००० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेऊ शकणारे महाघातक ड्रोन्स सैन्यात दाखल केले जाणार आहेत. या घोषणेने मॉस्को आणि क्रिमलिन प्रशासनाची झोप उडवली आहे.
25 Jul 2026 05:13 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती. सरकारसोबत काल च्या बैठकीनंतर आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता. आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंतरवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. क्रॉकोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून आंदोलन करताना झालेला त्रास दर्शवत आहे.
25 Jul 2026 04:57 PM (IST)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी जंतर-मंतर येथे तसेच नंतर सफदरजंग आणि मेदांता रुग्णालयात आमरण उपोषण केले होते. वाचा सविस्तर...
25 Jul 2026 04:47 PM (IST)
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "राजीनामा हे पहिलं पाऊल... पूर्ण विजय अजून बाकी आहे! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा विजय मानणे ही घाई ठरेल. गेल्या १० वर्षांत गुणवत्तेचा बळी देऊन, भ्रष्टाचार आणि विशिष्ट विचारसरणी लादण्यासाठी ज्या प्रकारे पेपरफुटीचे सत्र चालवले गेले, ती देशातल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांशी केलेली घोर प्रतारणा आहे. केवळ राजीनाम्याने पाप धुतले जात नाही: लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सूत्रधारांना आणि दोषींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही."
25 Jul 2026 04:37 PM (IST)
जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेला काँग्रेसने ब दर्जा देऊन गुंडाळून ठेवली सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे येथील शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला उर्जितावस्थेत आणून हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन या योजनेला गतिमान केल्याने येथील शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळून शेतकरी सुखी, समृद्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी बांधकाम मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी काढले.
25 Jul 2026 04:27 PM (IST)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत या निर्णयाचे श्रेय देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिले. त्यांनी हा तरुणांच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, असा दावाही संजय राऊत यांनी केला. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
25 Jul 2026 04:17 PM (IST)
India Vs Zimbabwe 2nd T20 Series: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी२० सामना आज २५ जुलै रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना ४. ३० वाजता सुरु होईल. सिकंदर रझा झिम्बाब्वे संघाचे तर श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान नुकताच या सामन्याचा टॉस पार पडला. भारताकडे मालिका जिंकण्याची संधी असणार आहे. झिम्बाब्वे ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...
25 Jul 2026 04:09 PM (IST)
अखेर तब्बल 35 दिवसांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांनी मोठा जल्लोष साजरा केला. मात्र अभिजित दीपकेंकडून आता मोठी घोषणा करण्यात आली असून त्यांनी आता सरकारसमोर तीन नव्या मागण्या ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘आम्ही मैदान सोडणार नाही,’ असा आवाहन त्यांनी केले आहे. वाचा सविस्तर...
25 Jul 2026 03:59 PM (IST)
अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे नेहमी सामाजिक विशयानावरे आपले मत मांडत असतो. गेल्या काही दिवसात देशामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण सुव्यवस्थेसाठी देशभरात आंदोलने केली. सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी उपोषणावर बसले होते. 26 व्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतले. अशामध्ये CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की “जरी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी आपण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाशिवाय मागे हटणार नाही आहोत. जर पंतप्रधान मोदींनी यावर पाऊले उचलली नाहीत तर त्यांची खुर्चीही धोक्यात असेल.”
25 Jul 2026 03:55 PM (IST)
CJP/NEET Paper Leak Case: राजधानी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू होते. नीट पेपर लिक प्रकरणी गेल्या 37 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते. सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी सीजेपीने केली होती. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. त्यातच आता दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत.
25 Jul 2026 03:45 PM (IST)
पाकिस्तान (Pakistan) सध्या एकाच वेळी निसर्गाचा धुमाकूळ आणि राजकीय-राजनैतिक संकटाचा सामना करत आहे. पंजाब प्रांतातील चिनाब नदीच्या पाण्याची पातळी अचानक अत्यंत वेगाने वाढल्यामुळे सीमावर्ती भागात आणि सखल गावांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः लियाकतपूरच्या ‘बेट परारा’ भागातील नदीचा मुख्य संरक्षक बंधारा पाण्याच्या तुफान प्रवाहामुळे फुटला आहे, ज्यामुळे काही तासांतच संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. हजारो घरे पाण्याखाली गेली असून, स्थानिक नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घरे सोडून सुरक्षित स्थळी पलायन करावे लागत आहे.
25 Jul 2026 03:35 PM (IST)
NTA Revenue: अजुनही एनटीए वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तत्पुर्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत की, देशात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर मोठ्या प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे उत्पन्न गेल्या ५ वर्षांत किती झाले आहे.
25 Jul 2026 03:14 PM (IST)
अखेर कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला तब्बल 35 दिवसानंतर यश आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटीनंतर देशातील 21 विद्यार्थ्यानी केलेल्या आत्महत्येनंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर CJP चे प्रमुख अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन उभारण्यात आले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर याप्रकरणी देशभरातून रोष व्यक्त करण्यात आला. आणि त्यानंतर देशभरातील विविध शरहांत मोठे आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनाला आता यश आले असून प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, यावर अभिजित दिपके यांची मोठी प्रतिक्रिया आली असून ‘वी हेव्ह डन इट” म्हणत त्यांनी इतर आंदोलकांबाबरोबर जल्लोष व्यक्त केला आहे.
25 Jul 2026 03:12 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिली आहे. यानंतर जंतर-मंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून रांकाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या तिन्ही मागण्या करा आम्ही घरी जाऊ, लिखित मागण्या लिहून द्या, आम्ही जातो.
25 Jul 2026 03:04 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिली आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. दरम्यान आज दुपारी 4 वाजता मातोश्रीवर ठाकरेबंधूची संयुक्त पत्रकार परिषद
25 Jul 2026 03:00 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिली आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. दरम्यान क्रॉकेच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर मैदानावर जल्लोष करण्यात येत आहे.
25 Jul 2026 02:59 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते शनिवारी पहाटे पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
25 Jul 2026 02:54 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिली आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. याच घडामोडी दरम्यान महाराष्ट्रामध्येही हालचाल सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
25 Jul 2026 02:52 PM (IST)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिली आहे. केंद्र सरकारने धर्मेद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती. सरकारसोबत काल च्या बैठकीनंतर आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला होता. आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपुर्वीच सरकारने धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला.
25 Jul 2026 02:49 PM (IST)
'हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्चाचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.', असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
25 Jul 2026 02:40 PM (IST)
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
25 Jul 2026 02:32 PM (IST)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला
25 Jul 2026 02:20 PM (IST)
दिल्लीतील नीट पेपरफुटी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मुंबईत शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा तिरंगा मोर्चा निघणार आहे. मोर्चा शांततेत पार पडावा आणि विशेषतः विद्यार्थिनींना कोणताही त्रास होऊ नये, असा कडक इशारा राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिला.
25 Jul 2026 02:11 PM (IST)
CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी, "दिल्ली पोलिसांनी RSSचा गणवेश घालावा," असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली.
25 Jul 2026 02:00 PM (IST)
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या १९ चेंडूंमध्ये ५० धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियासाठी हे त्याचे पहिले अर्धशतक होते. या खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकारही मारले होते. अशाप्रकारे, वैभवने इंग्लंडमधील आपले अपयश मागे टाकून एका नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.
25 Jul 2026 01:55 PM (IST)
नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे .
25 Jul 2026 01:50 PM (IST)
मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) १२.८६ लाख प्रवाशांवर कारवाई करून १०१.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ११.३४ लाख प्रवाशांवर कारवाई करून ७०.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कारवाईच्या प्रकरणांत १४ टक्क्यांची, तर दंडाच्या महसुलात ४३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
25 Jul 2026 01:45 PM (IST)
अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या आणि सध्या तेथे कार्यरत असलेल्या लाखो भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी (IT Professionals) अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. बोस्टन येथील अमेरिकेच्या ‘फर्स्ट सर्किट कोर्ट ऑफ अपील्स’ या फेडरल अपील न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाला मोठा कायदेशीर धक्का दिला आहे. एच-१बी व्हिसावर तब्बल १,००,००० डॉलर्सचे (सुमारे ८३ लाख रुपये) अवाढव्य आणि मनमानी शुल्क आकारण्याविरुद्ध कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची ट्रम्प प्रशासनाची मागणी न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
25 Jul 2026 01:40 PM (IST)
महापालिकेच्या विविध रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ५०० कंत्राटी व ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी २०१७ च्या महासभेतील ९० टक्के वेतनाच्या ठरावाची अंमलबजावणी, वेतनातील फरकाची थकबाकी, पीएफ दंडाच्या नावाखाली कपात करण्यात आलेले ७९ लाख रुपये परत करणे आणि किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारपासून रुग्णसेवा अबाधित ठेवत काम बंद न करता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
25 Jul 2026 01:35 PM (IST)
नशामुक्त भारत अभियानांतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू कळवा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळवा (जिल्हा ठाणे) येथे जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण विभाग व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य तथा नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
25 Jul 2026 01:30 PM (IST)
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी तब्बल ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ३० टक्के म्हणजेच १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २३ जुलै रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
25 Jul 2026 01:30 PM (IST)
लातूर जिल्ह्यातून के धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला रत्नागिरी जिल्ह्यात डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत तिच्याला पाळवून नेण्यात आलं होत. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला असून पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
25 Jul 2026 01:25 PM (IST)
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री इवा ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा नवा प्रोजेक्ट नसून, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेला धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना इवाने तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक कटू अनुभव पहिल्यांदाच उघडपणे माध्यमांना सांगितले. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.
25 Jul 2026 01:18 PM (IST)
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकांना कायमस्वरूपी वीजबिलाच्या ओझ्यातून करण्यासाठी राज्य शासनाने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजना सुरू केली. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानामुळे पात्र बीपीएल ग्राहकांना केवळ २,५०० रुपयात १ किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौर प्रकल्प उभारता येणार असून, त्यामुळे हजारो कुटुंबांच्या घरात स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेचा प्रकाश पोहोचणार आहे.
25 Jul 2026 01:10 PM (IST)
शहागंज परिसरातील १० वर्षीय मुलीच्या अपहरण व सुटका प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आरोपीने घटनेच्या सुमारे तासभर आधी मनपा मुख्यालयासमोरून चोरी केल्याचे उघड झाले आहे. रिक्षाच्या नोंदणी क्रमांकावरून मालकाचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
25 Jul 2026 01:03 PM (IST)
इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेला घाटी परिसरातून दुचाकीवरून पळवून नेत तिला डांबून ठेवत सलग दोन दिवस अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १६ ते १७ जुलैदरम्यान घडला आहे. बेगमपुरा पोलिसांनी तपास करुन आरोपीला नेवासा (जि. अहिल्यानगर) येथून बेड्या ठोकल्या आहेत. राजू माळी असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
25 Jul 2026 12:48 PM (IST)
शिक्षक असलेल्या मैत्रीणीला भेटण्यास आल्यानंतर २४ हजारांची रोकड, सोन्याचे दागिणे असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झालेल्या मित्राला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातील वडोदरा येथून अटक केली असून, मैत्रीण शेजारी डब्बा देण्यास गेल्यानंतर त्याने ही चोरी केली होती. यश कैलास भुलचंदानी (वय. 24, रा. मोहाडी, जि. म्हैसाणा, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले १४ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.
25 Jul 2026 12:36 PM (IST)
घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासेवाडी परिसरातील कुख्यात परदेशी गँगशी संबंधित गुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर आरोपी तातडीने घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नूर शेखला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जखमी नूर शेख हा राज्यभरात गाजलेल्या वनराज आंदेकर मर्डर केस मधील महत्त्वाचा आयव्हिटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याची चर्चा आहे. पण पोलिसांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य हल्लेखोर सुजल परदेशी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
25 Jul 2026 12:24 PM (IST)
देशभरात पेपरफुटीवरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, लाखोंच्या संख्येने विद्यार्थी व पालक आंदोलनात सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस पक्षानेही सर्वात आधी लढा देण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेस पक्षाने आता हे आंदोलन गावोगावी पोहचवण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आज शनिवार दिनांक २५ जुलै २६ रोजी प्रत्येक जिल्ह्यात कँडल मार्च आणि सत्याग्रह आयोजित केला आहे, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.
25 Jul 2026 12:12 PM (IST)
पीएमपीएमएल ही ठेकेदाराच्या फायद्यासाठी चालविली जाते का ? असा उपराेधिक प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावर जाेरदार टिका केली. महापालिकेच्या सभागृहात पीएमपीएमएलला आर्थिक अनुदान देण्यासंदर्भातील विशेष सभेत नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बसस्थानकांची दुरवस्था, वाढती आर्थिक तूट, भाडेतत्त्वावरील भूखंडांची माहिती, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पेन्शनचा प्रस्ताव, अनुकंपा तत्वावरील रखडलेली भरती, पदाेन्नती गैरव्यवहार, किरकाेळ किंमतीत जुन्या बॅटरीची विक्री, वाहनांची देखभाल दुरुस्ती अशा विविध मुद्यांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. केवळ विराेधी पक्षाचेच नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या पक्षातील सदस्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.
25 Jul 2026 12:00 PM (IST)
लंडनमधील आलिशान मॅरियट हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या सौदीच्या 29 वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहाद अल सौद यांच्या मृत्यूचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. यूके कोरोनरच्या अहवालानुसार, मद्य आणि GHB पार्टी ड्रगसह इतर पदार्थांच्या प्राणघातक मिश्रणामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
25 Jul 2026 11:50 AM (IST)
भारतीय टेक कंपनी Lava ने इंडियन मार्केटमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 यांचा समावेश आहे. लावाचा नवीन स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या भागिदारीत तयार करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत 15 हजारांहून कमी आहे. या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
25 Jul 2026 11:40 AM (IST)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुणे विमानतळावर आणले असून, पुढील चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला पुण्यात नेण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, आरोपीच्या चौकशीदरम्यान पेपर लीक नेटवर्कशी संबंधित अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा बऱ्याच काळापासून मुख्य आरोपीचा शोध घेत होत्या. सततचा तपास आणि तांत्रिक सर्वेक्षणावरून पोलिसांना त्याची लोकेशन बिहारमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर भिवंडी पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
25 Jul 2026 11:26 AM (IST)
पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ६८ हजार पशुधनाला प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कवच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून १६ लाख २८ लाख २४४ लशींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून अनेक पशुधनाला आजपर्यंत लसीकरण करण्यात आले.
25 Jul 2026 11:15 AM (IST)
एक अनोखी बाईक दिसून येईल ज्यावर बाईकचे सीट गायब असून त्याच्या जागोवर चक्क टाॅयलेट सीट बसवण्यात आले होते. सुरुवातीली ही मस्करी असल्याचे वाटते, असे वाटतं की, व्यक्तीने मुद्दाम फक्त खोटी टाॅयलेट सीट बाईकवर बसवली आहे पण जसजसा कॅमेरा सीटच्या जवळ जातो तसतसा गैरसमज दूर होऊ लागतो. कॅमेरा जवळ नेताच बाईकवर खरोखरची टाॅयलेट सीट बसवण्यात आली आहे. व्यक्ती जवळ जाऊन फल्श देखील करुन दाखवतो. जुगाडाचे हे अजब-गजब दृष्य पाहून यूजर्स चांगलेच थबकले असून या जुगाडाची खरंच गरज होती का यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.






