Crime News Live Updates
लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील भीमा तांडा येथे एका व्यसनाधीन पित्यानं आपल्या चार वर्षीय मुलीची चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागातून गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही क्रूर घटना रविवारी (29 जून 2025) दुपारी घडली असून, आरोपी पिता बालाजी राठोड याला पोलिसांनी हत्या प्रकरणी अटक केली आहे.
30 Jun 2025 05:48 PM (IST)
गॅस पुरवठा बंद करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे येथील एका डॉक्टर महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ७३ वर्षीय ड़ॉक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 Jun 2025 04:58 PM (IST)
कात्रज घाट परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२८ जून) रात्री घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर आंबेगाव पोलिसांत गु्न्हा नोंद केला आहे. कैलास नारायण आखुटे (वय५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षदरम्यान आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.
30 Jun 2025 04:57 PM (IST)
नगर रस्त्यावर केसनंद फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजन गंभीर जखमी झाला आहे. ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. अपघातात टेम्पोतील क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
30 Jun 2025 04:50 PM (IST)
कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे लहान पुल आहे.४० वर्षे जुन्या असलेल्या या पुलाचा पाया हा खचला असल्याची माहिती काही स्थानिक लोकांना मिळाली.त्यानंतर स्थानिक रहिवाशी आणि नेरळ पोलीस यांनी एकत्र येत त्या पुलाच्या बाजूची दुहेरी वाहतूक बंद करुन एकेरी वाहतूक सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
30 Jun 2025 04:05 PM (IST)
खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात आलेल्या महिलांनी कामगारांची नजर चुकवून तब्बल ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय सराफी दुकान मालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 Jun 2025 02:28 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वानवडी परिसरात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजविल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर टोळक्याने घराच्या दरवाज्यावर कोयते मारून तसेच खिडकीची काच देखील फोडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. लक्ष्मण राठोड आणि कुणाल मोरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तुकाराम कांबळे (वय ५२) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
30 Jun 2025 01:22 PM (IST)
मुंबईहून पुण्यात सोने घेऊन आलेल्या नामांकित पेढीच्या शोरूमचे ६९ लाख रुपये किंमतीचे ७४० ग्रॅम सोन्याचे दागिने पुणे स्टेशन बाहेरून चोरण्यात आले होते. याप्रकरणात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने राजस्थानातून सराईत गुन्हेगाराच्या मूसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून २४९ ग्रॅम वजनाचे १८ लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. रूपसिंह गुलाबसिंह रावत (३१, देलरा, दिवेर तहसील, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ११ जून रोजी पुणे स्टेशनबाहेर ही घटना घडली होती. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 Jun 2025 12:45 PM (IST)
सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
30 Jun 2025 12:30 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्यांचे फोटो लावून अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार करवीर तालुक्यातील स्मशानभुमीत घडला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी
30 Jun 2025 12:15 PM (IST)
नाशिक मधून एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बिडी कामगार परिसरातील बांधकाम साईटवर तयार केलेल्या एका कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या मुलांचे मृतदेह अग्निशमन दलाने तलावातून बाहेर काढले.
30 Jun 2025 12:15 PM (IST)
पनवेल शहरातील तक्का रोडवरील मोराज रेसिडेन्सी पार्क येथे दोन दिवसांची नवनवजात मुलगी (स्त्री अर्भक) रस्त्यावर टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपी अमान इकबाल कोंडकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
30 Jun 2025 12:00 PM (IST)
जयपूरमध्ये एका घरात विवाहित जोडप्याचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांनीही आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण या दोघांची हत्या तर झालेली नाही ना? असा पैलू तपासला जात आहे. शुक्रवारी या दोघांचे मृतदेह जयपूर या ठिकाणी असलेल्या मूहाना या भागात त्यांच्याच घरात सापडले. गुरुवारी या दोघांचे भांडण झाले होते याचा सीसीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. मृतकाचे नाव धर्मेंद्र आणि सुमन आहे. धर्मेंद्र बँकेत काम करत होता आणि सुमन ही गृहिणी होती. सविस्तर बातमी
30 Jun 2025 11:57 AM (IST)
जुने वाद, गल्लीतील भाई, परिसरातील दादा होण्याचा मोह तसेच भागातील भाई/दादा मीच, यासाठी सांस्कृतिक व शांतताप्रिय शहरात वाहनांचे ‘खळखट्याक’ होत असल्याचे भयावह वास्तव आहे. धक्कादायक म्हणजे, वाहन तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. चालू वर्षात (३१ मेपर्यंत) तब्बल ४० घटना घडल्या असून, केवळ ७२ जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ४० मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
30 Jun 2025 11:45 AM (IST)
‘गे डेटिंग’ अॅपवरून ओळख झालेल्या एका बँक अधिकाऱ्याला सापळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून आरोपींनी ब्लॅकमेल करत तब्बल ८० हजार रुपयांची उकळणी केली. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.सविस्तर बातमी
30 Jun 2025 11:44 AM (IST)
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका सराईताला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले असून सारसबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. नरेश उर्फ नब्या सचिन दिवटे (वय २२, रा. सर्व्हे क्रमांक १३३, दांडेकर पूल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक भारमळ, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, सागर केकाण, राहुल तांबे, विक्रम सावंत, रमेश चव्हाण, विकास केद्रे व त्यांच्या पथकाने केली आहे.
30 Jun 2025 11:36 AM (IST)
कांदिवलीतील केईएस शाळेत बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. कांदिवली पश्चिम इथल्या केईएस शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. धमकीनंतर कांदिवली पोलिसांचं पथक शाळेत पोहोचलं. परंतु तपासानंतर पोलिसांना काहीही सापडलं नाही. याविषयी पोलिसांनी सांगितलं की, “ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती, सध्या वातावरण शांत आहे. शाळेत कोणत्याही प्रकारचा बॉम्ब ठेवलेला नाही.”
30 Jun 2025 11:35 AM (IST)
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. हा प्रकार एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या गोंधळात अनेक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सविस्तर बातमी
30 Jun 2025 11:23 AM (IST)
हातउसने दिलेल्या ४०० रुपयांवरून दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न कण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सचिन शिवाजी माने (वय ३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत माने याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
30 Jun 2025 11:23 AM (IST)
स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.