जळगाव झेडपीसाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरु झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Local Body Elections 2025: जळगाव : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. अद्याप निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केलेली नसली तरी इच्छुकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षाकडून तयारी केली जात आहे. झेडपी निवडणुकीचे बगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ६८ गट १३४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने गट आणि गटातील आरक्षण जाहीर झाले आहे. त्यात ५० टक्के महिलांचा आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी युतीबाबत संभ्रम कायम असल्याने नेत्यांचीही अडचण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत यापूर्वीच काढली गेली आहे. कित्येक वर्षांनंतर परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण निघाल्यामुळे अध्यक्षपदासाठी यंदाही मोठी रस्सीखेच असणार आहे. त्याचप्रमाणे दावेदारांचा आकडा वाढणार आहे. झेडपीत भाजपला अध्यक्ष पदासाठी लागणारे बहुमत सिध्द करण्यासाठी बाहेरून इतर पक्षांचे सदस्य बऱ्याचवेळा आयात करून अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली जाते. मातब्बतरांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या सौभाग्यवंतींना निवडणुकीसाठी इच्छुक दिग्गजांकडून उतरविण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात गट रचनेतील फेरबदल कुणाच्या पथ्यावर पडणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
झेडपीच्या गटाच्या रचनेतील बदल आणि आरक्षणाचा फटका बहुतांश माजी जिल्हा परिषदांच्या सदस्यांना बसला आहे. यामुळे त्यांना आता माजीच राहण्याची वेळ आली आहे. मात्र काही ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवतींना याठिकाणी संधी मळणार आहे. महायुतीतील भाजप, शिंदे गट शिवसेना सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांमध्ये युती होण्याचे संकेत सध्यास्थितीत नाहीत. त्यामुळे महायुतीत इच्छुकांची सध्या एकटा चलोरेची भूमिका दिसत आहे.
जि.प. अध्यक्षपदासाठी होणार जोरदार चुरस
झेडपीसाठी दिग्गजांसह गटात प्राबल्य असलेल्या इच्छुकही वाढले आहेत. विशेषत: महायुतीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. जि.प. साठी ५० टक्के ३४ जागांवर महिला निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महिलांच्या निम्म्या जागा आरक्षित आहेत. त्यामुळे अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने त्यांची लॉटरी कुणाला लागणार हे निवडणुकीनंतरच समजणार आहे. मात्र अध्यक्षपदासाठी चुरस होण्याची शक्यता यंदा अधिक आहे. कारण मागील वर्षी अध्यक्ष पद महिला राखीव असल्याने सवाच्याच नजरा या पदाकडे लागल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाविकास एकत्र, मात्र महायुतीबाबत प्रश्नचिन्ह
जिल्ह्यात महाविकास आघाडीने राजकीय मोट बांधल्यास यातील राजकीय पक्षांचे या निवडणुकीत अस्तित्वा राहणार आहे. सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, उबाठा शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षानी या निवडणुकीत एकत्र ताकद दाखविल्यास त्यांचे अस्तित्व राहणार आहे. तिन्ही पक्षांची आघाडी महायुतीच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान देऊ शकते.






