जालना : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता जालन्यात अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या थोरल्या भावाची धाकट्या भावाने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत हत्या केली. जालन्यातील सोमठाणा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
परमेश्वर राम तायडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर राम तायडे असे आरोपी भावाचे नाव आहे. परमेश्वर याची पत्नी आणि त्याचा धाकटा भाऊ ज्ञानेश्वर यांचे अनैतिक संबंध होते. प्रेमसंबंधात सख्खा भाऊ अडथळा ठरत असल्याने धाकट्या भावाने वहिनीच्या मदतीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत गळा आवळून थोरल्या भावाची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून दगड बांधून तलावात फेकून दिल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी परमेश्वर याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : Dharashiv Crime: तुळजापूर तालुक्यात भर चौकात कुऱ्हाडीने तरुणावर वार, जागीच झाला मृत्यू, काय घडलं नेमकं?
पत्नीचीही मिळाली साथ
प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने वहिनीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला. त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला. ही घटना बदनापूर तालुक्यातील वाला सोमठाणा तलावात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
भावासह पत्नीलाही केली अटक
या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर राम तायडे आणि त्याला साथ देणारी परमेश्वर याची पत्नी मनिषा परमेश्वर तायडे हिलाही पोलिसांनी अटक केली आहे.
भररस्त्यात एकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून मौजे केशेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चौकात कुऱ्हाडीने हल्ला करून एका व्यक्तीची गावातील तरुणानेच सगळ्यांसमोर निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे केशेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीच सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.






