पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाने थेट सासूवरच केला चाकूने हल्ला (संग्रहित फोटो)
कराड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथील दांगट वस्तीत प्रेमसंबधातून एका ३० वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार (दि. १३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय ३५) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केले असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबधित महिला विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट वस्ती येथे आई-वडिलांकडे राहण्यास आहे. तिला तीन मुले आहेत. रविंद्र याच्याशी तिचा पूर्वीचा परिचय असून, तिचे त्याच्याशी प्रेमसंबधही होते. गुरुवारी दुपारी रविंद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर रविंद्रने तिच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेल्याने तिचा जबडा पूर्ण फाटून ती गंभीर जखमी झाली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्लेखोर रविंद्रने घटनास्थळावरून पलायन केले असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देवून पाहणी करून घटनास्थळचा पंचनामा केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करत आहेत.
पुतण्याने केला चुलत्याचा खून
आर्थिक वादविवादातून पुतण्याने चुलत्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याची घटना पाषाण येथे घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय.५६,रा. पाषाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश यांचा मुलगा वरद तुपे (वय १९) याने तक्रार दिली आहे. त्यावरून शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०) आणि ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. सर्व पाषाण) यांना अटक केली आहे.