संग्रहित फोटो
मसूर : मसूर (ता. कराड) येथे मेंहदी काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शंकर बदु जाधव (रा. मसूर, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या अत्याचाराच्या घटनेने मसूर परिसर हादरला आहे.
पिडीत महिला पतीसह मसूरमध्ये राहते. पीडीत महिला मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच होती. खोलीचा दरवाजा वाजल्याने तीने दरवाजा उघडला. यावेळी ओळखीचाचं असलेला शंकर बध्दू जाधव (रा. मसूर) होता. त्याने पिडीतेस तुम्ही मेहंदीची ऑर्डर घेता का?, मेहंदीचा क्लास घेता का असे विचारले. पिडीतेने मेहंदीची ऑर्डर घेते. परंतु क्लास घेत नाही असे सांगितले. यावेळी त्याने मेहंदीचे फोटो पहाण्यास मागितले. त्याला मोबाईलमधील मेहंदीचे फोटो दाखवत असताना माझे पप्पा खाली आहेत, पाच मिनीट थांबा, पप्पा वर गेले की, मी जातो असे म्हणून त्याने दरवाजाला कडी लावली.
पिडीतेने त्याला मी घरात एकटीच आहे, तुम्ही बाहेर जावा असे सांगितले. दरम्यान संशयिताने पिडीतेचा गळा दाबला तसेच जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. पिडीतेने पतीला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या घटनेची नोंद मसूर पोलिसात झाली आहे. अधिक तपास मसूर पोलिस करीत आहेत.