पूर्वी भारतावर अनेक शासकांनी राज्य केले. या राज्यकर्त्यांनी त्याकाळी उंच उंच इमारती बांधल्या, ज्या आज भारताच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये समाविष्ट आहेत. अनेक इमारती तर अशा अद्भुत प्रकारे बांधल्या आहेत की त्यांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येत असतात. दिल्ली एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला अनेक सुंदर किल्ले, थडगे, मशिदी आणि उंच मिनार पाहायला मिळतील.
जर आपण मिनारांविषयी बोलणे केले तर दिल्लीतील कुतुबमिनार अनेकांनी प्रत्यक्षात किंवा फोटोत पाहिला असेल. अनेकदा पाहिला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का की राजधानीत एक मिनार देखील आहे ज्याला ‘चोर मिनार’ म्हणून ओळखले जातो. याच्या नावावरूनच या जागेचे गूढ लक्षात येते. असे म्हणतात की हे ठिकाण चोरांशी संबंधित आहे, ज्यांचे डोके येथे लटकवले जायचे. हे ऐकल्यावरच तुम्ही या जागी जाण्याचा विचार करत असाल, मात्र त्याआधी या ठिकाणाचा इतिहास जाणून घ्या.
दिल्लीतील हौज खास भागातील औरंगजेब रोडवर चोर मिनार आहे. असे मानले जाते की, हा मिनार 12 व्या शतकात बांधला गेला होता आणि त्याच्या बांधकामाचे संपूर्ण श्रेय अलाउद्दीन खिलजीला जाते, जो खिलजी घराण्याशी संबंधित होता.
या मिनारमध्ये 225 छिद्रे असून, अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत चोरी आणि दरोडेखोरांना मारल्यानंतर त्यांची मुंडकी या छिद्रांतून लटकवली जात असल्याचे सांगितले जाते. अलाउद्दीनच्या विरोधात कोणीही बंड करू नये आणि सर्वांनी त्याच्याशी भयभीत राहावे म्हणून असे केले जायचे. त्याच वेळी, जर डोक्याची संख्या छिद्रांपेक्षा जास्त असेल तर कमी महत्त्वाच्या मृत लोकांची डोकी मिनाराच्या बाहेर पिरॅमिडवर ठेवली जायची.
हेदेखील वाचा – Raksha Bandhan 2024: फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच ‘या’ मंदिराचे दार उघडतात, 364 दिवस मंदिर असते बंद
चोरमिनार व्यतिरिक्त या मिनाराला ऑफ बीहेडिंग आणि चोरांचा मिनार या नावानेही ओळखले जाते. असे मानतात की, अलाउद्दीनने आपल्या राजवटीत अनेक मंगोलियांची हत्या केली होती. ज्यांचे डोके कापून टॉवरच्या छिद्रातून टांगण्यात आले होते. असे म्हटले जाते की, मंगोलियाच्या आक्रमणकर्त्यांमुळे अलाउद्दीनच्या सैन्याला खूप लढावे लागले आणि अनेक वेळा त्यांनी अलाउद्दीनच्या हल्ल्यांना खडतर आव्हान देखील दिले.
हा मिनार पाहण्यासाठी तुम्ही हौज खास स्टेशनवर पोहोचू शकता आणि तेथून ऑटो करू शकता. या ठिकाणी भेट देण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी आहे, त्यामुळे या काळातच तुम्ही या मिनाराला भेट देऊ शकता.