एक अद्भुत अन् अनोखं ठिकाण जिथे राहतात फक्त 20 लोक! 10 लाखांहून अधिक पक्ष्यांचे घर
पृथ्वी अनेक सुंदर आणि अद्भुत ठिकाणांना भरलेली आहे. आपल्याला माहितीही नसतील इतक्या सुंदर आणि अनोख्या गोष्टींचं इथे वास्तव आहे. जगभरात भेट देण्यासाठी अनेक अनोखी ठिकाणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे आइसलँडच्या उत्तरेला असलेले ग्रिम्से (Grimsey) बेट. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बेटावर केवळ 20 लोक राहतात, परंतु दरवर्षी 10 लाखांहून अधिक पक्षी येतात. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता पर्यटकांना आकर्षित करते. याशिवाय, येथील सर्वात खास आकर्षण म्हणजे इथल्या टेकड्यांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर आढळणारे पक्षी, ज्यात पफिन आणि इतर समुद्री पक्षी आहेत.
बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ग्रिम्से बेटाची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ते आर्क्टिक सर्कलमध्ये स्थित आहे. या बेटाचा आकार लहान असूनही पक्षीप्रेमींसाठी ते स्वर्गापेक्षा कमी नाही. या बेटावर राहणाऱ्या लोकांचे जीवन अतिशय साधे आणि शांत आहे, येथील लोक निसर्गाशी पूर्णपणे जोडलेले आहेत. नववर्षात जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणाचा विचार करू शकता.
New Year 2025: नववर्षात हे नाही पाहिलं तर काय पाहिलं, स्वर्गाहून सुंदर आहे ‘हे’ बटरफ्लाय पार्क
इथे राहणाऱ्या लोकांचे जीवन काही अशाप्रकारे
येथे राहणारे लोक मासेमारी आणि पक्ष्यांची अंडी गोळा करणे यासारख्या समुद्रातील संसाधनांवर अवलंबून असतात. याशिवाय या बेटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे इथला छोटा समुदाय, जो खूप मैत्रीपूर्ण आहे. कमी लोकसंख्येमुळे येथील जीवनशैली अत्यंत साधी आणि शांत आहे. ग्रिम्से आयलंड हे एक अद्भुत ठिकाण आहे, जिथे एकीकडे पक्ष्यांचे साम्राज्य आहे, तर दुसरीकडे येथील लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी समुद्राशी संबंधित कामांवर अवलंबून आहेत. ज्यांना शांतता आणि निसर्गाशी जोडण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे बेट एक आवडते ठिकाण बनू शकते.
इथे नाहीत कोणत्याही सुविधा
ग्रिम्से बेटावर एकही हॉस्पिटल, डॉक्टर किंवा पोलिस स्टेशन नाही. तटरक्षक दल आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आपत्कालीन सेवांद्वारे येथील लोकांना प्रशिक्षित केले जाते. येथे दर तीन आठवड्यांनी एक डॉक्टर विमानाने येतो. येथील लोक आपले जीवन लवचिक पद्धतीने जगतात आणि वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्यास तयार असतात.
भारतातून येथे कसे जात येईल
भारतातून ग्रिम्सेला जाण्यासाठी, प्रथम तुम्हाला आइसलँडची राजधानी रेकजाविकला जावे लागेल. रेकजाविक येथून तुम्ही ग्रिम्से बेटांच्या जवळचे शहर अकुरेरीला जाऊ शकता. यानंतर बेटावर जाण्यासाठी फेरीचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या सहलीचे नियोजन करताना हवामान तपासण्याची खात्री करा आणि त्यानंतरच इथे जाण्याचे नियोजन करा.