सौजन्य - Istock
आयआरसीटीसी ने रेल्वे प्रवाशांसाठी एक उत्तम पॅकेज आणले आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये या टूर पॅकेजचा वापर तुम्ही करू शकता. पावसाळा सुरू झाला की भटकंती करण्याचे खूप मन होते. हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य वातावरण पाहुन मन अगदी तृप्त होऊन जाते. देशात विविध भागात अल्हादायक वातावरण असते. पण कुठे फिरायला जायचे म्हणले की अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो. पहिल्यांदा आपल्याला बजेटचा विचार करावा लागतो. खिशात पैसे असतील तर मग कशाचीच चिंता राहत नाही. पण निराश होऊ नका यासाठी आयआरसीटीसी एक पर्यटकांसाठी उत्तम पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हांला ३-४ दिवस फिरायला मिळणार आहे. या पॅकेज मध्ये कोणती ठिकाणे आणि अजुन काय आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
तिरुपती टूर पॅकेज
• हे पॅकेज 2 जुलैपासून सुरू होणार आहे.
• यामध्ये 1 रात्र आणि 2 दिवसांची टूर करू शकता.
• पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेन आणि कॅबने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
• पॅकेज फी तीन लोकांसह प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 7,300 रुपये, तर मुलांसाठी पॅकेज फी 5,720 रुपये आहे.
चेन्नई ते लडाख टूर पॅकेज
• हे पॅकेज १८ ऑगस्टपासून सुरू होईल.
• ६ रात्री आणि सात दिवसांचे हे पॅकेज असेल.
• या पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि कॅबने प्रवास करण्याची संधी मिळेल.
• पॅकेज फी तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 52,500 रुपये आहे. मुलांचे तुम्हाला 46,000 रुपये वेगळे भरावे लागतील.
महेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन टूर पॅकेज
• 7 ऑगस्टपासून हे पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे.
• हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
• पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि कॅबने करायला मिळेल.
तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 25350 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 16500 रुपये आहे.
• यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकता.
प्रयागराज, सारनाथ आणि वाराणसी टूर पॅकेज
• हे पॅकेज 20 जुलैपासून सुरू होत आहे.
• पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि बसने प्रवास करण्याची संधी मिळत आहे.
• 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
• तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 29,850 रुपये आहे. मुलांसाठी 17,400 रुपये आहे.






