फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महेंद्रसिंह धोनी : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची गणना ही दिग्गज क्रिकेट खेळाडूंमध्ये केली जाते. तो त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षी देखील क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रेम दिले जाते, त्याचबरोबर क्रिकेटप्रेमी त्याला मैदानामध्ये पाहणं पसंत करतात. भारताच्या संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय विश्वचषक २०११ जिंकला आहे असा करणारा तो भारताचा एकमेव कर्णधार आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तो अजूनही डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. धोनी सोशल मीडियावर तितका सक्रिय नाही, पण चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करताना कधीच थकत नाहीत.
आता बऱ्याच दिवसांपासून आयपीएलच्या सुरु आहेत. चेन्नई चा संघ धोनीला रिटेन करणार की नाही अशा चर्चा सुरु आहेत. परंतु क्रिकेटच्या व्यतिरिक्त आता धोनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशा चर्चा सुरु आहेत. नक्कीच प्रकरण काय यावर एकदा नजर टाका. आता महेंद्रसिंह धोनीच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राजकीय पक्षांमध्ये त्याचबरोबर नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं वादळ आलं आहे. आता झारखंड विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये एमएस धोनीकडे मोठी जबाबदारी आली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी धोनीची राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत कॅप्टन कुल निवडणूक आयोगाच्या SVEEP या जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग असेल. धोनीही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसणार आहेत म्हणजेच जाहिरात करताना दिसणार आहे. झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के. यासंदर्भात माहिती रवी कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना के रवी कुमार म्हणाले, ‘प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी झारखंड विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या SVEEP जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग असेल. याबाबतचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. निवडणूक आयोग झाडूच्या कॅम्पिंगमध्ये धोनीच्या फोटोचा वापर केला जाणार आहे.
पुढे त्यांनी सांगितले की, ‘मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे त्यांनी केलेले आवाहन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपयोगात येईल. धोनी मुख्य निवडणूक अधिकारी, झारखंडच्या कार्यालयात सामील होईल आणि मतदार जागृती मोहिमेत सहकार्य करेल. नामवंत व्यक्तींच्या सहवासामुळे मतदार जागृती अभियानाला बळ मिळणार आहे.
रवी कुमार शुक्रवारी (25 ऑक्टोबर) निर्वचन सदन, धुर्वा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला ३८ जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या संदर्भात रवी कुमार यांनी २५ ऑक्टोबर रोजी निर्वचन सदन, धुर्वा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.