भुवनेश्वर कुमार (फोटो- ians)
विराट कोहली नव्या रेकॉर्डपासून 58 रन्स दूर
भुवनेश्वर कुमारने गाजवले आयपीएल 2026
आजच्या सामन्यावर पावसाचे सावट
Tata IPL 2026 SRH Vs RCB Live Updates: थोड्याच वेळात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू होणार आहे. दरम्यान यंदाच्या आयपीएलमधला हा दोन क्वालिफाय झालेल्या संघांमध्ये सामना होणार आहे. आरसीबीकडून सध्या भुवनेश्वर कुमार हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आज केवळ 1 विकेट घेतल्यावर भुवनेश्वर कुमार नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे.
यंदाच्या हंगामात भुवनेश्वर कुमारने आरसीबीकडून भेदक आणि अचूक गोलंदाजी केली आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लवकरच भारतीय संघात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आज एसआरएचविरुद्ध भुवनेश्वर कुमार नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे भुवनेश्वर कुमारने आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 161 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये तूफान गोलंदाजी करणारा भुवनेश्वर कुमार शेवटच्या ओव्हर्समध्ये तितकाच घातक ठरत आहे.
IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
यंदा भुवनेश्वर कुमार ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीतही आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 24 4विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 99 विकेट्स घेतल्या आहेत. जर का आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली,तर तो नवा रेकॉर्ड रचणार आहे. त्याने आजच्या सामन्यात 1 विकेट घेतल्यावर डेथ ओव्हर्समध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरणार आहे.
प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’
आयपीएलच्या २०२६ च्या हंगामात शर्यत आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. तीन संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला असून चौथ्या आणि अंतिम जागेसाठी चार संघांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्लेऑफमधील आपले स्थान मजबूत केले आहे. तर, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचे भवितव्य आता उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. गुजरातने चेन्नईवर मोठा विजय मिळवत टॉप-2 मध्ये स्थान जवळपास पक्के केले, तर चेन्नई सुपर किंग्स अधिकृतपणे स्पर्धेबाहेर पडली आहे.
रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु सध्या १८ गुण आणि +१.०६५ च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानी आहे. चेन्नईविरुद्धच्या शानदार विजयामुळे गुजरात संघ १८ गुण +०.६९५ वर पोहोचला आहे. तर हैदराबाद संघ १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबीचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हैदराबादचा पराभव करुन ते गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवू शकतात . हा विजय त्यांना २० गुणांपर्यंत नेईल आणि क्वालिफायर १ मधील त्यांचे स्थान निश्चित करेल.






