बीडच्या गेवराईमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई कार्यालयामध्ये आठ ते दहा जणांनी हल्ला केला होता. यामधील एक हल्ल्यादरम्यानचा सीसीटीव्ही समोर आला आहे. आरोपी एका चार चाकी गाडीतुन येत आहेत कार्यालयाबाहेरील स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊन उतरल्यानंतर पळत जात आहेत. यासंदर्भात थोड्या वेळापूर्वीच आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. तर हा हल्ला माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येच्या उद्देशाने झालेला होता असा दावा आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक डावखर यांनी केलेला आहे.