Range Rover Sport
Car Tips: कार विकण्याआधी करा ‘या’ सोप्या गोष्टी; मिळेल बेस्ट डिल
रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही २.०५ कोटींच्या एक्स-शोरूम किमतीत भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हा व्हेरिएंट एसव्ही एडिशन टू पेक्षा खालच्या सेगमेंटमध्ये असल्याने, तुलनेत याची किंमत ३० लाख रुपयांनी कमी आहे.या स्टायलिश रेंज रोव्हर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू झाली असून ऑगस्ट २०२६ मध्ये डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
लॅंड रोव्हरचा दावा आहे की, २०२६ रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही खास भारतासाठी तयार केलेल्या पेंट ऑप्शनसह येते. या रंगांमध्ये सॅटिन फिनिश ग्रीन, मॅट फिनिशऑरेंज, ग्लॉस फिनिश ब्लू, मॅट फिनिश वॉयलेट आणि ग्लॉस फिनिश टील यांचा समावेश आहे. या रंगांना कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रुफ आणि २२-इंचाचे फोर्ज्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. हे सर्व वैशिष्ट्ये भारतात लॉंच झालेल्या एसयूव्हीसला आणखी खास बनवतात.
रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीच्या एकस्टिरियरमध्ये ‘एसव्ही’ लोगो, चार एक्झॉस्ट पाईप्स आणि एक स्टायलिश रिअर स्पॉयलर आहे. याव्यतिरिक्त, यात ब्लॅक-आउट पिलर्स, रिअरव्यू मिरर हाउसिंग्ज (ORVMs), ‘रेंज रोव्हर’ आणि ‘लँड रोव्हर’ ब्रँडिंग, फ्रंट स्प्लिटर व ग्रिल आणि एअर इनटेक्स आहेत. एडिशन टू व्हेरिएंटमध्ये २३-इंचाची हलकी कार्बन फायबर व्हील्स, ब्रेम्बो कार्बन सिरेमिक ब्रेक्स, एक फोर्ज्ड कार्बन फ्रंट स्प्लिटर, एक कार्बन फायबर बोनेट, ‘एडिशन टू’ ब्रँडिंग आणि व्हेरिएंट- स्पेसिफिक पर्याय देण्यात आले आहेत.
२०२६ रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीच्या इंटीरियरमध्ये ‘लाइट क्लाउड’ आणि ‘एबोनी’ थीममधील पर्फोरेटेड विंडसर लेदर सीट्स आणि एक स्लाइडिंग पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रेंज रोव्हर एसव्हीमध्ये एक्सटेंडेड लेदर पॅकेज, सिग्नेचर मेरिडियन साउंड सिस्टीम आणि ‘एसव्ही’ ब्रॅंडिंगसह इल्युमिनिटेड डोअर सिल्स देखील आहेत. तसेच, एडिशन टू व्हेरिएंट कार्बन-फायबर ट्रिमसह उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही वैशिष्ट्ये खास भारतीय बाजारपेठेसाठी डिझाइन केली गेली आहेत.
रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीमध्ये माईल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह ४.४-लिटरचे द्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे ६३५ हॉर्सपॉवर आणि ७५० Nm टॉर्क निर्माण करते. हे पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. लॅंड रोव्हरचा दावा आहे की, रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही केवळ ३.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग गाठू शकते.
CNG Kit Price : पेट्रोल कारला CNG किट बसवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी






