राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. भुजबळांनीही मंत्रिपद न मिळाल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करत “जहा नही चैना, वहा नही रहना..”. असं म्हणत आपली नाराजी उघड केली होती. त्यानंतर भुजबळ आणि अजीत पवार यांच्यातील वादाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. आता भुजबळ पुढे नेमकं काय पाऊल उचलणार ही चर्चा होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथे आयोजित बैठकीसाठी भुजबळ शिर्डीत आले आहेत. मात्र अजित दादांबद्दल अद्याप नाराजी मिटली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.