लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धारण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात होणारी यंदाची विधानसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी असणार आहे ती शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे. यापूर्वी चार प्रमुख पक्षात होणारी हि लढत आता सहा प्रमुख पक्षात होणार आहे. तसेच यापूर्वीच्या निवडणुकीत नैसर्गिक म्हणवले जाणारे मित्र पक्ष निवडणुकीपुरता स्वबळाचा नारा देत आपली ताकत आजमावायचे मात्र यंदा कुणालाही स्वबळाच्या बेटक्या फुगवणे परवडणारे नाही त्यामुळे यंदाची सरळ लढत हि भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आणि उद्धव सेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मध्ये होणार आहे. मात्र यामुळे प्रत्येक पक्षाकडे आपल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी कमी स्पेस असणार आहे, त्यातल्या त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे मात्र तुलनेने ज्यास्त स्पेस असल्याने आणि नव्या दमाच्या शिलेदारांना संधी देण्यासह धोरण असल्याने इतर पक्षातील क्षमता असलेल्या आणि त्याच्या विधानसभा क्षेत्रात चांगले वजन असलेल्या इच्छुकांचा ओढा राष्ट्रवादी कोंग्रेस शरद पवार गटाकडे दिसून येतोय त्यामुळेच राष्ट्रवादीचे शरद पवार हे भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपचे विवेक कोल्हे हे हातात तुतारी घेऊन आगामी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धारण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कागलचे समरजित घाटगे हे भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रेवश करत आहेत. तसेच शरद पवारांनी टाकलेल्या गळात अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले हे प्रमुख नेते अडकतील अशी शक्यता आहे कारण या नेत्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.