एकीकडे बुलढाणा नगरपालिका कर गोळा करण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे शहरातील नागरिक पाणी प्रश्नामुळे त्रस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.. बुलढाणा शहरासह म्हाडा कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, पर्यायाने पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे, यामुळे आता नगरपालिके प्रति प्रचंड रोष पाहायला मिळतोय, त्रस्त झालेले म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, लवकरच नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे…