कल्याण- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्याबद्दल देशभरात प्रचंड संताप आहे. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर द्यावे अशी सरकारला मागणी आहे.या संदर्भात, गुरुवारी कल्याण पूर्वेतील खाडेगोळवली येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या निषेधादरम्यान, नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली आणि हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या आंदोलनात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह महादेव रायभोळे, माजी उपमहापौर उमेश म्हात्रे, युवासेनेचे मधुर म्हात्रे, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.