आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवघी सात वर्षाची चिमुकली ‘एसएसपी’ या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे..हातकणंगले मधील ओवी सागर पुजारी या चिमुकलीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी काळाने घाला घातला आणि खेळण्या बागडण्याच्या वयात ती अंथरुणाला खिळली..अवघ्या सात वर्षाच्या मुलीची अवस्था पाहून आई-वडील ही गहिवरले..एसएसपीई हा दुर्मिळ आजार तिच्या आयुष्यात आल्याने तिच्यासोबत तिच्या कुटुंबियाचे ही जगणं मुश्किल झालं..पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीची हालचाल हळूहळू मंदावत गेली..त्यानंतर तिला अचानक झटके येऊ लागले..आई-वडिलांनी तात्काळ उपचारासाठी डॉक्टरकडे नेलं..मात्र दुर्मिळ आजार असल्याने उपचार होणं ही कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं..या आजारावर भारतात कुठेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर ही हतबल झाले होते..मात्र हे औषध जगभरात कुठेतरी मिळेल अशी आशा डॉक्टरांनी सागर पुजारी यांना दिली.