काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसामुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी आज लातूर महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पिण्याचा पाणीपुरवठा, कचरा, नालेसफाई आणि वाहतुकीच्या कोंडीच्या समस्यांबाबत चर्चा करून शहरात पुन्हा समस्या उद्भवू नये, यासाठी पावले उचलण्याच्या आ. देशमुख यांनी सूचना केल्या. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी पिवळसर पाण्याचा नळाद्वारे नागरिकांना पुरवठा झाला होता. भविष्यात दूषित पाणीपुरवठा होणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही आ. अमित देशमुख यांनी पालिका आयुक्तांना यावेळी केल्या.