एकीकडे पाहालगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय, अश्यातच लातूर शहरात ” तू पाकिस्तानी आहेस ” म्हणत 30 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. घटना शहरातील संविधान चौकात घडलीय, पाकिस्तानी म्हणून हिनवून अपमान केल्यामुळे 30 वर्षीय आमिर पठाण याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय, मयत आमिर पठाण याची पत्नी समरीन पठाणच्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात कलम 108, 115, 351, आणि 352 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता अज्ञात गुन्हेगाराच्या शोधात आहेत तर मयत आमिर पठाण याच्या पत्नीने गुन्हेगारांस कडक शिक्षेची मागणी केली आहे.