महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे..काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.. विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोध असेल शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात येईल अशी भूमिका सरकारने घेतली होती.. मात्र निवडणूक झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यातं..त्यामुळे गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापुरात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भव्य परिषद घेवून शक्तीपीठ महामार्ग विरोधात एल्गार पुकारण्यात आला होता..याच पार्श्वभूमीवर आज अधिवेशन सुरू असताना विधानभवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.. यासाठी आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातील हजारो शेतकरी एकवटले आहेत.. एक वर्षासाठी 7 जिल्हातून तडीपार केल्याने क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.