नवी मुंबईतील वाशी सेक्टर १ मध्ये महानगरपालिकेच्या इमारतीत एक वृद्ध महिला अनेक वर्षांपासून राहात होती. या इमारतीतच नागरी आरोग्य केंद्रही सुरू आहे. सानपाडा सेक्टर ५ मधील व्यायामशाळेत दारू पार्टी प्रकरणानंतर प्रशासनाने अशा इमारतींवर कारवाई सुरू केली. मात्र, वाशीमध्ये ही कारवाई करताना माणुसकीचा पूर्ण विसर पडल्याचं समोर आलं आहे. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता वृद्ध महिलेला तिच्या संसारासकट रस्त्यावर हाकलण्यात आलं. या प्रकरणी प्रशासनाकडे विचारणा केली असता, त्या महिलेला नंतर कुठे हलवलं याची माहिती अधिकाऱ्यांनाही नव्हती. हे संपूर्ण प्रकरण पालिकेच्या बेजबाबदारपणाचे आणि माणुसकीला लाज आणणाऱ्या वर्तनाचे उदाहरण ठरत आहे.