दिघा परिसरातील विकास कामे ठप्प झाल्याचा आरोप करत खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप उमेदवारांच्या पराभवाबाबत प्रतिक्रिया दिली. दिघा भागातील अनेक घरांवर अनधिकृत असल्याच्या नोटिसा येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या वतीने या नोटिसा थांबवून घरांना कायमस्वरूपी दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे उपनेते व नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांच्या वाढदिवसानिमित्त दिघा परिसरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.