पेण-खोपोली रस्त्यावरील रिंगरोड परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याच समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक भूषण कडू यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.भूषण कडू यांनी कागदाच्या होड्या तयार करून त्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात सोडल्या. या उपक्रमातून त्यांनी रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाची उदासीनता अधोरेखित केली आहे.