दौंड तालुक्याच्या दुष्काळी गावांच्या हद्दीत मुरुम माफियांचा धुडगूस; बेकायदा उत्खननाचा कळस
पाटस : दौंड तालुक्यातील रोटी, हिंगणी गाडा, वासुंदे, जिरेगाव, कुरकुंभ, कुसेगाव, पडवी, देऊळगाव गाडा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा मुरुम उत्खनन आणि विना परवाना वाहतुकीचा मोठा उद्योग सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या या प्रकरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, महसूल विभाग आणि वाहतूक पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दौंड महसूल विभागाच्या डोळ्यादेखत तालुक्यातील दुष्काळी भागातील डोंगर आणि माळरान जेसीबी, पोकलेन मशीनने अक्षरशः पोखरली जात आहे. यासाठी गौण खनिज विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोप आहे. एका हायवा वाहनातून 9 ते 10 ब्रास मुरुमांची वाहतूक केली जात रोज पालखी महामार्गावरून पाटस दौंड काष्टीला दहा ते पंधरा हायवा वाहनाने 24 तास भरधाव वेगाने हायवा वाहतूक चालू असल्याचे सांगितले जात असून, या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.
या बेकायदा उत्खननामुळे धूप वाढण्याचा पावसाने पाणी न आणल्याने शेतीवर विपरीत परिणाम होण्याचा तसेच पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, पालखी महामार्गावर शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि वारकऱ्यांची मोठी वजन असताना भरधाव हायवामुळे गंभीर आपल्यात होण्याची भीती नागरिक व्यक्त केली जात आहे. या उत्खननामुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. माळरान आणि डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पाठबळ आणि भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांचे संगनमताने हे उत्खनन बिनधास्त सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे.
दौंड तहसीलदार आणि महसूल विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने त्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग आणि वाहतूक पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, दौंड उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे आणि दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी लक्ष घालून तातडीने सर्व बेकायदा उत्खनन बंद करावे, उत्खनन करणाऱ्या आणि वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांवर गुन्हे दाखल करुन ती वाहने जप्ती करून ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
दरम्यान, या संदर्भात दौंडच्या निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे-देशमुख यांनी सांगितले की, बेकायदा माती आणि मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी महसूलचे पथके तैनात करून ठोस अशी कारवाई केली जाईल.






