महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडताच शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मुंबई गोवा महामार्गावरून भरत गोगावले यांची वाजत गाजत कलंबोळी ते महाड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाच्या रस्सी खेच याबद्दल बोलताना गोगावले यांनी आमचे पारडे जड असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्या रूपाने पालकमंत्री पद देतील असे गोगावले म्हणाले. रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकासाची जबाबदारी गोगावलेंवर देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी महायुती सरकार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेदेखील आभार मानले आहेत.