पेण तालुक्यात ६४ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणी केली होती. परंतु अनेक ठिकाणी निवडणुका लांबल्याने प्रशासक राज होते. त्यातच आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या मनसुभ्यावर पाणी पडले आहे. अपेक्षित आरक्षण न आल्याने गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांची गोची झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती अनेक ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ पोट नियम (४) (५) (६) नुसार त्या-त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या, मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करुन अचूक आरक्षण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. पेणमधील एकूण ६४ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जागेसाठी खुला वर्ग १, अनुसूचित जमातीसाठी १४ पैकी खुला वर्ग ७ जागा, महिलांसाठी ७ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील १७ जागांपैकी खुला वर्ग ८ जागा, महिलावर्ग ९ जागा, सर्वसाधारण ३२ जागेसाठी खुला वर्ग १६ जागा, महिलावर्ग १६ जागा असे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सभा घेण्यात आला होती. हे आरक्षण सन २०२५ ते २०३० या कालवधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायीसाठी लागू असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले.