कल्याण ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राबवला. या उपक्रमाचे आयोजन मनसेचे पदाधिकारी तकदीर काळण यांच्या पुढाकारातून करण्यात आले. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट करत, “मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, हेच आमचे ध्येय आहे,” असे मत व्यक्त केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपासून लेखन साहित्यापर्यंत आवश्यक सर्व वस्तू मोफत देण्यात आल्या. पालक व शिक्षक वर्गातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.